Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि ओस असेपर्यंत तो आपल्या शब्बाथांचा विसावा उपभोगीत राहील; त्यांनी माझे विधी मानण्यास नकार दिला व माझे नियम तुच्छ लेखले म्हणूनच त्यांना त्यांच्या पापाचा दंड भरावा लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 कारण ती भूमी ओसाड पडल्यामुळेच शब्बाथांचा आनंद उपभोगू शकत आहे. ते त्यांच्या पापांची परतफेड करतील कारण त्यांनी माझे नियम नाकारले आणि माझ्या विधींचा तिरस्कार केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:43
28 Iomraidhean Croise  

तो संकटात पडला तेव्हा तो आपला देव परमेश्वर ह्याला शरण गेला आणि आपल्या पूर्वजांच्या देवासमोर फार दीन झाला.


परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुरे होऊन देशास शांततेचा3 काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले; देश ओस पडला होता तोवर म्हणजे सत्तर वर्षे पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती.


पाहा, ईश्वर ज्याचे शासन करतो तो पुरुष धन्य! म्हणून सर्वसमर्थाचे शासन तुच्छ मानू नकोस;


मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे, पण आता मी तुझे वचन पाळत आहे.


मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.


हे परमेश्वरा, तुझे निर्णय न्यायानुसार आहेत, आणि सत्यतेने तू मला पिडले आहेस हे मी जाणतो.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तू तर शिस्तीचा द्वेष करतोस, माझी वचने मागे झुगारून देतोस.


हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‍गत तुला कळवले.


मी वळल्यावर पश्‍चात्ताप केला; मला बोधप्राप्ती घडल्यावर मी ऊर1 बडवू लागलो; माझ्या तारुण्यातील अपकीर्तीच्या भारामुळे मी लज्जित व फजीत झालो आहे.’


ह्यास्तव परमेश्वराने विपत्तीवर नजर ठेऊन ती आमच्यावर आणली आहे; कारण आमचा देव परमेश्वर जी काही कृत्ये करतो ती न्याय्य आहेत, पण आम्ही त्याची वाणी ऐकली नाही.


मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही.


माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,


तुमच्या पूजेची उच्च स्थाने मी उद्ध्वस्त करीन, तुमच्या सूर्यमूर्ती1 फोडून टाकीन आणि तुमच्या मूर्तींच्या मढ्यांवर तुमची मढी फेकून देईन; माझ्या जिवाला तुमची किळस येईल.


तसेच ते माझ्याविरुद्ध चालले ह्या कारणामुळे मीही त्यांच्याविरुद्ध होऊन त्यांना शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील, आणि त्यांचे अशुद्ध2 ह्रदय लीन होऊन ते आपल्या दुष्टतेचा दंड मान्य करतील.


वेशीत हितबोध करणार्‍यांचा ते द्वेष करतात, सात्त्विकपणे बोलणार्‍याचा वीट मानतात.


मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.


जगाने तुमचा द्वेष करावा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण त्याची कृत्ये वाईट आहेत अशी मी त्याच्याविषयी साक्ष देतो.


कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होता येत नाही.


आपल्या लोकांचा आश्रय तुटला आहे, बद्ध किंवा मुक्त असा कोणी उरला नाही, हे परमेश्वर पाहील तेव्हा तो त्यांचा न्याय करील, त्याला आपल्या सेवकाचा कळवळा येईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan