Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:42 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

42 तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी स्मरेन. त्याचप्रमाणे इसहाकाशी केलेला करार व अब्राहामाशी केलेला करार ह्यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

42 तेव्हा जो करार मी याकोबाशी केला तो मी आठवेन तसेच इसहाकाशी केलेला करार व अब्राहाम ह्याच्याशी केलेला करार यांची मी आठवण करीन व त्या देशाचीही मी आठवण करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

42 तेव्हा मी अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्याबरोबर केलेल्या कराराचे स्मरण करेन आणि त्या भूमीचे स्मरण करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:42
26 Iomraidhean Croise  

त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो.


तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “खाली मिसरात जाऊ नकोस; मी सांगेन त्या देशात राहा.


त्याच रात्री परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, “तुझा बाप अब्राहाम ह्याचा मी देव आहे; भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी आपला सेवक अब्राहाम ह्याच्यासाठी तुला आशीर्वादित करीन व तुझी संतती बहुगुणित करीन.”


कारण अब्राहामाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.”


आणि पाहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला, “मी परमेश्वर तुझा पिता अब्राहाम ह्याचा देव व इसहाकाचा देव आहे; ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन;


पाहा, मी तुझ्याबरोबर आहे; जिकडे-जिकडे तू जाशील त्या सर्व ठिकाणी मी तुझे संरक्षण करीन; आणि तुला ह्या देशात परत आणीन. तुला सांगितले ते करीपर्यंत मी तुला अंतर देणार नाही.”


देव त्याला आणखी म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू फलद्रूप होऊन बहुगुणित हो; तुझ्यापासून एक राष्ट्रच काय, तर राष्ट्रसमूह उत्पन्न होईल आणि तुझ्या पोटी राजे निपजतील.


जो देश मी अब्राहाम व इसहाक ह्यांना दिला तो तुला देईन आणि तुझ्यामागे तुझ्या संततीलाही तोच देश देईन.”


तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्‍यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही.


धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणार्‍या कराराचे मला स्मरण होईल.”


तू ह्या प्रसंगी गप्प राहिलीस तरी दुसर्‍या कोठूनही यहूद्यांची सुटका व उद्धार होईलच. पण मग तुझा व तुझ्या बापाच्या घराण्याचा नाश होईल. तुला ह्या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावरून?”


त्याने आपल्या कराराचे स्मरण त्यांच्यासाठी करून आपल्या अपार दयेने त्यांची कीव केली.


ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


देवाने त्यांचा आकांत ऐकला तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्याशी केलेल्या कराराचे त्याला स्मरण झाले,


शिवाय ह्या इस्राएल लोकांना मिसर्‍यांनी दास करून ठेवले आहे. त्यांचा आक्रोश ऐकून मी आपल्या कराराचे स्मरण केले आहे.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


तरी मी तुझ्या तारुण्यात तुझ्याबरोबर केलेला करार स्मरून तुझ्याबरोबर सर्वकाळचा करार करीन.


तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.


अशासाठी की, ‘आपल्या पूर्वजांवर’ त्याने ‘दया’ करावी, आणि त्याने ‘आपला’ पवित्र ‘करार’,


कारण तुझा देव परमेश्वर हा दयाळू देव आहे; तो तुला अंतर देणार नाही, तुझा नाश करणार नाही आणि तुझ्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही.


तुझे दास अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांची आठवण कर आणि ह्या लोकांचा हट्ट, दुष्टाई व पाप ह्यांकडे लक्ष देऊ नकोस;


परमेश्वराचा दूत गिलगालाहून बोखीम येथे येऊन लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसर देशातून काढून तुमच्या पूर्वजांना शपथेवर देऊ केलेल्या देशात आणले; तुमच्याशी केलेला माझा करार मी कधी मोडणार नाही;


Lean sinn:

Sanasan


Sanasan