Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हांला तोलून परत देतील; ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मी तुमच्या धान्याचा पुरवठा बंद करील तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर तुमची भाकर भाजतील व ती तुम्हास तोलून देतील; ती तुम्ही खाल पण तुम्ही तृप्त होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 मी तुमच्या भाकरीचा पुरवठा बंद करेन, तेव्हा दहा स्त्रिया एकाच चुलीवर भाकर भाजू शकतील आणि त्या भाकरीचे वजन करून देतील. तुम्ही खाल परंतु तृप्त होणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:26
17 Iomraidhean Croise  

तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली; वेढा एवढा भारी पडला की, गाढवाच्या एका मुंडक्याला ऐंशी रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेला पाच रुपये पडू लागले.


त्याने देशावर दुष्काळ आणला; त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला.


पाहा, प्रभू, सेनाधीश परमेश्वर, हा यरुशलेम व यहूदा ह्यांचा आधार व टेका काढून घेतो, म्हणजे भाकरीचा सर्व आधार व पाण्याचा सर्व आधार काढून घेतो;


दहा बिघे द्राक्षमळा दहा शेर रस देईल; एक मण बी एक पायली धान्य देईल.”


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,


ते उपोषण करतील तेव्हा मी त्यांची आरोळी ऐकणार नाही; ते होमार्पण व अन्नार्पण मला आणतील ती मी स्वीकारणार नाही; मी तलवारीने, दुष्काळाने व मरीने त्यांचा संहार करीन.”


“मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून माझ्याविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवीन, त्याच्या अन्नाचा आधार तोडीन, देशात दुष्काळ पाडीन, आणि त्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन;


तू जे अन्न खाशील ते वजनाने रोजचे वीस शेकेल असून ते तू मधून मधून खा


तो आणखी म्हणाला, “मानवपुत्रा, पाहा, मी यरुशलेमेत भाकरीचा आधार तोडीन म्हणजे लोक कष्टी होऊन भाकर तोलून खातील, व भयभीत होऊन पाणी मापून पितील.


कारण भाकर व पाणी ह्यांची तूट पडेल, लोक एकमेकांकडे पाहून भयचकित होतील आणि अधर्मावस्थेत क्षय पावतील.”


मी तुमचा नाश करण्यासाठी उपासमारीचे नाशकारक तीक्ष्ण बाण सोडीन, तेव्हा तुमच्यावर मी दुष्काळाचा कहर करीन व तुमचा भाकरीचा आधार तोडीन.


ते खातील पण त्यांची तृप्ती व्हायची नाही; ते व्यभिचार करतील व त्यांची वाढ होणार नाही, कारण त्यांनी परमेश्वराकडे चित्त लावण्याचे सोडून दिले आहे.


एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात,


तू खाशील, पण तृप्त होणार नाहीस; तुझ्या ठायी कंगालपणा राहील; तू धनाची सारासार करशील, पण ते तुला वाचवता येणार नाही व तू काही वाचवलेस तर मी ते तलवारीच्या हवाली करीन.


तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती थोडे लागते; तुम्ही खाता, पण तृप्त होत नाही; तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही; तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही; मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan