Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मी तुमच्यावर तलवार आणीन, ती करार मोडल्याचा बदला घेईल; तुम्ही आपापल्या नगरात जमा व्हाल, तेव्हा मी तुमच्यावर मरी पाठवीन; मी तुम्हांला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मी तुमच्यावर तलवार आणीन ती करार मोडल्याचा बदला घेईल. तुम्ही आपआपल्या नगरांत जमा व्हाल, तेव्हा मी तेथे तुमच्यावर आजार पाठवीन, आणि तुम्ही तुमच्या शत्रुच्या बळामुळे पराभुत व्हाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:25
42 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराने इस्राएलात सकाळपासून नेमलेल्या मुदतीपर्यंत मरी पाठवली; आणि दानापासून बैर-शेब्यापर्यंतच्या लोकांपैकी सत्तर हजार लोक मेले.


तुझे लोक इस्राएल ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझ्याकडे वळतील आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून ह्या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करतील,


ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला,


अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा त्याग केला होता. ह्या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले.


हे पारिपत्य करणार्‍या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणार्‍या देवा, तू आपले तेज प्रकट कर.


ते म्हणाले, “इब्र्यांच्या देवाने आम्हांला भेट दिली; तर आता आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्यावा; असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल.”


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


आणि मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल.”


बाबेल देशातून जे पळून निभावून जात आहेत त्यांचा ध्वनी ऐका; तो ध्वनी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडून सूड, त्याच्या मंदिराविषयीचा सूड, सीयोनास कळवत आहे.


बाण पाजवा! ढाली धारण करा! परमेश्वराने मेद्यांच्या राजांना स्फूर्ती दिली आहे, नाश करावा अशी त्याच्याविरुद्ध त्याची योजना आहे; कारण हा परमेश्वराकडून सूड आहे, त्याच्या मंदिराविषयीचा सूड आहे.


आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.”


तरुण व वृद्ध रस्त्यांत जमिनीवर पडले आहेत; माझ्या कुमारी व माझे तरुण तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधदिनी त्यांचा वध केला आहे; तू त्यांना वधले, गय केली नाहीस.


मी देशावर तलवार आणून म्हटले की, अगे तलवारी, देशावर फीर आणि तिने मनुष्य व पशू ह्यांचा संहार केला;


तुम्हांला काठीखालून चालवून कराराने बद्ध करीन;


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्यावर तलवार आणीन आणि तुझ्यातून मनुष्य व पशू ह्यांचा उच्छेद करीन.


“मानवपुत्रा, तू आपल्या बांधवांबरोबर बोल. त्यांना सांग की, मी देशावर तलवार आणीन तेव्हा जर देशातल्या लोकांनी आपणांपैकी एकास निवडून पहारेकरी नेमले;


मी तुमच्यावर दुष्काळ व हिंस्र पशू पाठवीन; ते तुम्हांला नि:संतान करतील; मरी व रक्तपात तुमच्यावर येतील; मी तुमच्यावर तलवार आणीन; मी परमेश्वर हे म्हणालो आहे.”


असे म्हण : इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभू परमेश्वराचे वचन ऐका; प्रभू परमेश्वर पर्वत, टेकड्या, नाले व खोरी ह्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच तुमच्यावर तलवार आणून तुमची उच्च स्थाने उद्ध्वस्त करीन.


त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील.


मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हांला कोणाची भीती राहणार नाही; मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन, आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.


“मिसर देशातल्याप्रमाणे मी तुमच्यात मरी पाठवली; तुमचे तरुण पुरुष तुमच्या घोड्यांसह मी तलवारीने वधले आहेत; तुमच्या छावणीतील दुर्गंध थेट तुमच्या नाकात जाईलसे मी केले; तरी तुम्ही माझ्याकडे वळला नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


मरी त्याच्यापुढे चालते, जळते इंगळ त्याच्या पायांजवळ निघतात.


मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.”


कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे ऐंशी लोक मेले.


त्याप्रमाणे मोशे लोकांना म्हणाला, “युद्धासाठी तुमच्यातल्या पुरुषांना सशस्त्र करा म्हणजे ते मिद्यानावर चढाई करून परमेश्वराच्या वतीने मिद्यानाचा सूड घेतील.


मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्‍या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.


जो देश वतन करून घ्यायला तू जात आहेस तेथे तू नष्ट होईपर्यंत तुला मरी सोडणार नाही असे परमेश्वर करील.


बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो.


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


मी आपली चमकणारी तलवार पाजळली, मी न्याय हाती घेतला, तर मी आपल्या विरोधकांचा सूड घेईन, माझ्या वैर्‍यांचे उसने फेडीन.


तेव्हा यहूदातले तीन हजार वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, “पलिष्टी आमच्यावर सत्ता चालवत असल्याचे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस?” तो त्यांना म्हणाला, “त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan