Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मी तुमच्यावर वनपशू सोडीन आणि ते तुमची मुले उचलून नेतील, तुमच्या गुराढोरांचा नाश करतील, तुमची संख्या अगदी कमी करतील आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मी तुमच्यावर हिंस्त्र पशू पाठवीन आणि ते तुमच्या मुलांबाळांना उचलून घेऊन जातील; ते तुमच्या गुराढोरांचा नाश करतील; आणि तुमची संख्या कमी करतील. त्यामुळे तुमचे रस्ते ओस पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मी तुमच्यावर जंगली श्वापदे पाठवेन आणि ती तुमच्या लेकरांना उचलून नेतील, गुरांचा नायनाट करतील आणि तुमची संख्या कमी करतील; आणि त्यामुळे तुमचे रस्ते ओसाड होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:22
17 Iomraidhean Croise  

ते तेथे वस्ती करून राहू लागले तेव्हा ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगत नसत म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले; त्यांनी त्यांच्यातल्या कित्येकांना मारून टाकले.


त्याने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले व परमेश्वराचे नाव घेऊन त्यांना शाप दिला. तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांच्यातल्या बेचाळीस पोरांना फाडून टाकले.


त्या काळी बाहेर जाणारे व आत येणारे ह्यांपैकी कोणासही शांती नसे; देशाच्या सर्व रहिवाशांना फारच संकटे प्राप्त होत असत.


ह्यास्तव पृथ्वी शापाने ग्रासली आहे, तिचे रहिवासी पापाचे फळ भोगत आहेत; पृथ्वीचे रहिवासी जळून भस्म झाले आहेत, मानव थोडेच उरले आहेत.


राजमार्ग ओस पडले आहेत, कोणी प्रवासी आढळत नाहीत; त्याने करार मोडला, नगराचा उपमर्द केला, मनुष्यांचा धिक्कार केला.


“परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यावर चार गोष्टी आणीन : ठार करण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे.


यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,


पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.


मी देशात हिंस्र पशू धाडून तो उद्ध्वस्त केला आणि त्या पशूमुळे कोणी त्यातून जातयेत नाही इतका निर्जन तो केला;


तर मग मी तलवार, दुष्काळ, हिंस्र पशू व मरी ही माझी चार्‍ही उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशू ह्यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन, तेव्हा त्याचा निभाव कसा लागेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी हा देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल; इस्राएलाचे पर्वत वैराण होतील, कोणी त्या वाटेने जाणार नाही.


मी तुमच्यावर दुष्काळ व हिंस्र पशू पाठवीन; ते तुम्हांला नि:संतान करतील; मरी व रक्तपात तुमच्यावर येतील; मी तुमच्यावर तलवार आणीन; मी परमेश्वर हे म्हणालो आहे.”


मी तुमच्या देशाला शांतता देईन व तुम्ही झोपलेले असाल तेव्हा तुम्हांला कोणाची भीती राहणार नाही; मी देशातून हिंस्र पशू नाहीसे करीन, आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.


म्हणून तुमच्यामुळे सीयोन शेताप्रमाणे नांगरतील, यरुशलेम नासधुशीचा ढीग होईल व मंदिराचा पर्वत जंगलाने भरलेला उंचवटा होईल.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


ते भुकेने कासावीस होतील, प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील; श्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवीन.


अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या दिवसांत, याएलेच्या दिवसांत राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan