Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीक देणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुमची मेहनत व्यर्थ गोष्टींमुळे नाश पावेल, कारण तुमची जमीन पिके देणार नाही व तुझ्या देशातील झाडांना फळे येणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:20
21 Iomraidhean Croise  

तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”


त्याप्रमाणे अहाबाच्या दृष्टीस पडावे म्हणून एलीया निघाला. त्या वेळी शोमरोनात भयंकर दुष्काळ होता.


तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.


सुपीक जमिनीची तेथे राहणार्‍यांच्या दुष्टतेमुळे तो खारवट भूमी करतो.


परमेश्वर जर घर बांधत नाही तर ते बांधणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकर्‍यांचे जागरण व्यर्थ आहे.


कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस;


ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्‍या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल.


मी तर म्हणालो होतो की, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.”


त्यांनी गहू पेरला आणि कापणी काटेर्‍याची केली; त्यांनी कष्ट केले पण काही फायदा झाला नाही; परमेश्वराच्या तीव्र कोपामुळे तुमची आपल्या उपजा-संबंधाने फजिती होईल.”


तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.


तर नेमलेल्या काळात तुमच्याकरता मी पाऊस पाडीन, जमीन आपला उपज देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.


पाहा, लोकांच्या श्रमाची फलप्राप्ती अग्नीला भक्ष्य होते, राष्ट्रे व्यर्थ शिणतात, हे सेनाधीश परमेश्वर ह्याच्याकडून नव्हे काय?


त्या सर्व दिवसांत कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत; द्राक्षकुंडांतून पन्नास पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला वीसच मिळत.


मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला.


तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील, अशी मला तुमच्यासंबंधी भीती वाटते.


तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही; भूमी आपला उपज देणार नाही; आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल.


तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज, तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स शापित होतील.


तुझे सर्व वृक्ष आणि तुझ्या भूमीचा उपज ह्यांवर टोळधाड येईल.


कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे, पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे, व डोंगरांचे पायथे जाळून टाकीत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan