Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तुमच्या बळाचा गर्व मी मोडून टाकीन. तुम्हांला आकाश लोखंडासारखे व भूमी पितळेसारखी करीन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मी तुमच्या बळाचा गर्व मोडून टाकीन; तुमचे आकाश लोखंडासारखे व तुमची जमीन पितळेसारखी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 मी तुमच्या सामर्थ्याचा गर्व नाहीसा करेन आणि तुमचे आकाश लोखंडासारखे व पृथ्वी कास्यासारखी करून टाकेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:19
20 Iomraidhean Croise  

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.”


त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते तुझ्याकडे वळले,


गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.


जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा टाकतो तसा तो तिच्यात झेपा टाकील; त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालवली तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून टाकील.


उच्च स्थळी राहणार्‍यांना त्याने खाली आणले आहे; त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीनदोस्त केले आहे; धुळीस मिळवले आहे.


एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्‍याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.


“परमेश्वर असे म्हणतो, असाच मी यहूदाचा दिमाख, यरुशलेमेचा मोठा दिमाख नष्ट करीन.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


‘इस्राएलाच्या घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो : पाहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जिवाचा जिव्हाळा, असे जे माझे पवित्रस्थान ते मी भ्रष्ट करीन आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तलवारीने पडतील.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मिसर देशाला आधार देणारे लोक पडतील, त्यांच्या पराक्रमाचा तोरा उतरेल; मिग्दोलापासून सवेनेपर्यंत ते तलवारीने पडतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी हा देश ओसाडी व विस्मय ह्यांचा विषय करीन, त्यांच्या सामर्थ्याचा गर्व जिरेल; इस्राएलाचे पर्वत वैराण होतील, कोणी त्या वाटेने जाणार नाही.


ह्यास्तव मी परराष्ट्रांतले अधमाधम जन आणीन; ते त्यांची घरे हस्तगत करतील, मी जबरदस्तांचा ताठा मोडीन; त्यांची पवित्र स्थाने भ्रष्ट होतील.


आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.


ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्‍यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.


आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलीयाच्या दिवसांत साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता, तेव्हा इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या;


तसे केले तर परमेश्वराचा कोप तुमच्यावर भडकून तो आकाश बंद करील, म्हणजे पाऊस पडणार नाही; भूमी आपला उपज देणार नाही; आणि जो उत्तम देश परमेश्वर तुम्हांला देत आहे त्यातून तुमचा त्वरित नायनाट होईल.


तुझ्या डोक्यावरचे आकाश पितळेसारखे व तुझ्या पायांखालची जमीन लोखंडासारखी होईल.


परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला, आणि एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनहास ठार झाले.


लोक छावणीत परत आले तेव्हा इस्राएलाचे वडील जन म्हणू लागले, “परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आपण आणू या; तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan