Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मी माझे मुख तुमच्याविरुध्द करीन, म्हणून तुमचे शत्रू तुमचा पराभव करतील; जे लोक तुमचा द्वेष करीतात ते तुमच्यावर अधिकार गाजवतील, आणि कोणी तुमचा पाठलाग करत नसतानाही तुम्ही पळाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 मी तुम्हापासून आपले मुख फिरवेन आणि तुमच्या शत्रूंपुढे तुमचा पराभव होईल. ज्यांचा तुम्ही द्वेष करता तेच तुमच्यावर सत्ता गाजवतील आणि कोणी पाठलाग करीत नसतानाही तुम्ही पळाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:17
30 Iomraidhean Croise  

तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती ह्यापुढे तुला आपले सत्त्व देणार नाही, तू पृथ्वीवर परागंदा व भटकणारा होशील.”


तुझे लोक इस्राएल ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझ्याकडे वळतील आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून ह्या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करतील,


ह्यास्तव इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यांना यहोआहाज हयात होता तोपर्यंत अरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद ह्यांच्या स्वाधीन केले.


अरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ पन्नास स्वार, दहा रथ व दहा हजार पायदळ एवढेच राहू दिले होते व बाकीच्यांचा नाश करून त्यांना तुडवून धुळीस मिळवले होते.


तू आम्हांला शत्रूला पाठ दाखवायला लावलेस, आमचा द्वेष करणारे आम्हांला यथेच्छ लुटतात.


पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भेदरले आहेत; कारण तुझ्याविरुद्ध छावणी देऊन बसणार्‍यांची हाडे देवाने विखरली आहेत; तू त्यांची फजिती केली आहेस, कारण देवाने त्यांचा धिक्कार केला आहे.


देव करो आणि सीयोनेतून इस्राएलाची मुक्ती येवो. देव आपल्या लोकांचे दास्य उलटवील तेव्हा याकोब उल्लासेल, इस्राएल हर्ष पावेल.


कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


एकाच्या धमकीने तुमचे हजार पळतील, पाचांच्या धमकीने तुम्ही पळाल; डोंगरमाथ्यावरील एखाद्या ध्वजस्तंभा-सारखे, टेकडीवरील ध्वजेसारखे तुम्हीच तेवढे शेष उराल.


तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला.


ह्या स्थळी यहूदा व यरुशलेम ह्यांची मसलत मी निष्फल करीन; त्यांच्या शत्रूंपुढे त्यांचा जीव घेण्यास टपणार्‍यांच्या हाताने, तलवारीने ते पडतील असे मी करीन; त्यांची प्रेते आकाशांतील पक्ष्यांना व पृथ्वीवरील श्वापदांना भक्ष्य म्हणून देईन.


“ह्यामुळे सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमचे अनिष्ट करण्यासाठी व सर्व यहूदाचा उच्छेद करण्यासाठी मी तुम्हांला विन्मुख होईन.


तिच्या शत्रूंचे वर्चस्व झाले आहे; तिचा द्वेष करणारे चैनीत आहेत; कारण तिच्या बहुत अपराधांमुळे परमेश्वराने तिला पिडले आहे; वैर्‍यांपुढे तिची मुले बंदिवान होऊन गेली आहेत.


त्याने वैर्‍याप्रमाणे आपले धनुष्य वाकवले आहे, तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे; दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकले आहेत; त्याने सीयोनकन्येच्या तंबूवर अग्नीप्रमाणे आपल्या संतप्त क्रोधाचा वर्षाव केला आहे.


मी त्यांना विमुख होईन, ते अग्नीतून बाहेर पडले तरी अग्नी त्यांना खाऊन टाकील; मी त्यांना विमुख होईन, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणार्‍या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन.


तू तुझ्या शत्रूंपुढे मार खाशील असे परमेश्वर करील; तू एका वाटेने त्यांच्यावर चालून जाशील पण त्यांच्यापुढून सात वाटांनी पळून जाशील, आणि पृथ्वीवरील सर्व राज्यांना नकोसा होशील.


म्हणून लोकांतले सुमारे तीन हजार पुरुष तिकडे रवाना झाले; पण आय येथल्या माणसांपुढे त्यांना पळ काढावा लागला.


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने त्यांना लुटारूंच्या हाती दिले आणि लुटारूंनी त्यांना लुटले. परमेश्वराने त्यांना त्यांच्या सभोवतालच्या शत्रूंच्या हवाली केले; म्हणून त्यांचा आपल्या शत्रूंसमोर टिकाव लागेना.


म्हणून इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याचे अठरा वर्षे दास्य केले.


म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले.


मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.


परंतु तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकणार नाही आणि परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड कराल तर परमेश्वराचा हात जसा तुमच्या वाडवडिलांच्या विरुद्ध झाला होता तसा तुमच्याही विरुद्ध होईल.


पलिष्टी इस्राएलाशी लढले; तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.


मग पलिष्टी लढले आणि इस्राएल लोक पराभव पावून सगळे आपापल्या डेर्‍याकडे पळून गेले; त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्राएलाचे तीस हजार पायदळ कामास आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan