Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी तुमच्यामध्ये माझी वस्ती करीन आणि माझा जीव तुमचा तिरस्कार करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मी तुम्हामध्ये माझी वस्ती करीन; आणि मी तुमचा तिरस्कार करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मी तुमच्यामध्ये वस्ती करेन व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:11
27 Iomraidhean Croise  

मी इस्राएल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्राएल वंशाला इस्राएल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यांना तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधले नाही असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय?


मी इस्राएलामध्ये वस्ती करीन, आणि माझ्या इस्राएल प्रजेस मी टाकणार नाही.”


तुझ्यासाठी निवासस्थान, तुला युगानुयुग राहण्यासाठी मंदिर मी बांधले आहे.”


देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा?


त्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर भडकला; त्याला आपल्या वतनाचा वीट आला.


शालेमात त्याचा मंडप आहे; व सीयोनेत त्याचे निवासस्थान आहे.


हे ऐकून देव कोपला आणि इस्राएलास अगदी कंटाळला;


मी त्यांच्यामध्ये निवास करावा म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान तयार करावे.


आणि मी इस्राएल लोकांमध्ये राहीन आणि त्यांचा देव होईन.


त्यांच्यामध्ये राहण्यासाठी ज्याने त्यांना मिसर देशातून बाहेर काढले तो मी परमेश्वर त्यांचा देव आहे असे त्यांना कळेल; मी त्यांचा देव परमेश्वर आहे.


तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस; तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आमच्याशी केलेला करार स्मर, तो मोडू नकोस.


परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे, त्याला आपल्या पवित्रस्थानाचा वीट आला आहे; त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत; पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे.


तुम्ही समजाल की इस्राएल लोकांमध्ये मी आहे; मी परमेश्वर तुमचा देव आहे; अन्य कोणी नाही, व माझी प्रजा कधीही फजीत होणार नाही.


ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देणार आहे त्यांच्या चालीरीतींचे तुम्ही अनुकरण करू नये; त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांचा तिटकारा आला आहे;


माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला,


त्यांच्यावाचून देश ओस पडेल आणि त्यांच्यावाचून ओस असेपर्यंत तो आपले शब्बाथ उपभोगत राहील; त्यांनी माझ्या निर्बंधांचा अव्हेर केला व माझे विधी तुच्छ मानले म्हणूनच त्यांच्या दुष्टतेबद्दल केलेली शिक्षा ते मान्य करतील.


इतके झाले तरी ते आपल्या शत्रूंच्या देशात असताना त्यांचा समूळ नाश करावा व त्यांच्याशी केलेला करार अगदी मोडून टाकावा, एवढा त्यांचा मी नाकार करणार नाही अथवा त्यांना मी तुच्छ मानणार नाही, कारण मी परमेश्वर त्यांचा देव आहे;


मी एका महिन्यात तीन मेंढपाळ कापून टाकले, कारण माझ्या जिवाला त्यांचा कंटाळा आला व त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला.


प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात.


हे पाहून परमेश्वराला त्यांचा वीट आला, कारण त्याचे पुत्र व कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.


तुमच्या वतनाची भूमी अपवित्र असली तर परमेश्वराचा निवासमंडप जेथे आहे त्या परमेश्वराच्या वतनाच्या देशात नदीपार येऊन आमच्यामध्ये वतन घ्या, पण आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीखेरीज अन्य वेदी बांधून परमेश्वराविरुद्ध बंड करू नका आणि आमच्याविरुद्धही बंड करू नका.


तेव्हा एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याने रऊबेन, गाद व मनश्शे ह्यांच्या वंशजांना म्हटले, “आज आमची खात्री झाली आहे की, परमेश्वर आपल्यामध्ये आहे, कारण ह्या कामात तुम्ही परमेश्वराचा विश्वासघात केलेला नाही; तुम्ही आता इस्राएल लोकांना परमेश्वराच्या हातून वाचवले आहे.”


आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी : “‘पाहा,’ देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्याच्याबरोबर राहील.’


ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan