Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तुम्ही आपल्यासाठी मूर्ती करू नयेत; त्याचप्रमाणे कोरीव मूर्ती अथवा स्तंभ उभारू नयेत अथवा आकृती कोरलेला पाषाण पुजण्यासाठी आपल्या देशात स्थापन करू नये, कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तुम्ही आपणासाठी मूर्ती करु नका, तसेच कोरीव मूर्ती किंवा स्तंभ आकृती कोरलेला पाषाण पूजा करण्यासाठी आपल्या देशात, उभारू नका कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:1
30 Iomraidhean Croise  

त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरामूर्ती स्थापन केल्या;


त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या दोन ओतीव मूर्ती तयार केल्या; त्यांनी अशेरामूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली, आणि बआलमूर्तीची उपासना केली.


आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम व इस्राएलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम ह्यांचे त्यांनी अवलंबन केले होते.


त्यांनी आपल्या उच्च स्थानांमुळे त्याला राग आणला; आपल्या कोरीव मूर्तींमुळे त्याला ईर्ष्या आणली.


जे कोरीव मूर्तींची उपासना करतात जे मूर्तींचा अभिमान बाळगतात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो,2 त्याच्या चरणी लागा.


ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


तुम्ही माझ्या बरोबरीला दुसरे देव करू नका. आपल्यासाठी सोन्यारुप्याचे देव करू नका.


तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नयेस, त्यांची सेवा करू नयेस, आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नयेस, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावेस आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडेतुकडे करावेस.


तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस.


मनुष्यांनी पुजण्यासाठी केलेल्या सोन्यारुप्यांच्या मूर्ती त्या दिवशी लोक चिचुंद्र्या व वटवाघळे ह्यांच्यापुढे टाकून देतील.


तुम्ही मूर्तींकडे वळू नये आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नयेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


कारण इस्राएल लोक माझेच दास आहेत; मिसर देशातून काढलेले हे माझे दास आहेत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पण करील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा.


तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून द्या; आकृती कोरलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्च स्थाने पाडून टाका;


तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण, ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे असे आपल्याला वाटता कामा नये.


‘जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ती कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


‘ज्याने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून आणले तो मी परमेश्वर तुझा देव आहे.


कुत्रे, चेटकी, जारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, लबाडीची आवड धरणारे, व लबाडी करणारे सर्व लोक बाहेर राहतील.


दानवंशजांनी त्या कोरीव मूर्तीची स्थापना केली; देशाचा पाडाव होईपर्यंत गेर्षोमाचा मुलगा व मोशेचा नातू योनाथान व त्याचे वंशज दानवंशाचे पौरोहित्य करत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan