Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 25:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 25:9
20 Iomraidhean Croise  

ज्या लोकांना उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.


ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्लास करतात; तुझ्या न्यायपरायणतेने त्यांची उन्नती होते.


त्या दिवशी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल; तेव्हा अश्शूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वराला दंडवत घालतील.


नंतर पवित्रस्थान, दर्शनमंडप आणि वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्याचे संपवल्यावर त्याने तो जिवंत बकरा सादर करावा.


तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो;


कारण त्या दिवशी तुम्हांला शुद्ध करावे म्हणून तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल; परमेश्वरासमोर तुम्ही आपल्या सर्व पापांपासून शुद्ध ठराल.


“इस्राएल लोकांना सांग : सातव्या महिन्याची प्रतिपदा तुम्हांला परमविश्रामाची असावी; स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावीत व पवित्र मेळा भरवावा.


“त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.


सात शब्बाथवर्षे म्हणजे सात गुणिले सात एवढी वर्षे मोजा; ह्या सात शब्बाथवर्षांचा काळ एकोणपन्नास वर्षे होय.


योबेलवर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरवशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे.


ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेलवर्षी परत जावे.


आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”


मग इस्राएल लोकांचे योबेलवर्ष आल्यावरही ज्या वंशात त्या गेल्या असतील त्याच्या वतनात तो मिळवला जाईल; अशाने त्यांचे वतन आमच्या वाडवडिलांच्या वंशाच्या वतनातून कमी होईल.”


पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले होते. “त्यांचा नाद सर्व पृथ्वीवर, व त्यांचे शब्द दिगंतरी पोहचले.”


मासेदोनिया व अखया ह्यांत तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे, इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगायचे अगत्य नाही.


सात याजकांनी सात रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे; सातव्या दिवशी तुम्ही नगराला सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan