Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 25:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 देशाच्या शब्बाथाच्या उपजावर तुमचा, तुमच्या दासदासींचा, तुमच्या मजुरांचा व तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीयांचा निर्वाह होईल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तरी तुम्हास शब्बाथाच्या वर्षात भरपूर अन्न मिळेल व तुमच्या दासदासींना, तुमच्या मजुरांना व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयांनाही भरपूर अन्न मिळेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्या शब्बाथाच्या वर्षी जमीन जे काही पीक येईल ते सर्वांना म्हणजेच तुम्ही, तुमचे नोकरचाकर, तुमच्याकडे असलेले गुलाम आणि तुमच्यात राहणारा कोणीही परदेशीय यांना खाण्याची मोकळीक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 25:6
9 Iomraidhean Croise  

आता तुला हे चिन्ह देतो : यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल; पुढल्या वर्षी त्याचा खोंडवा फुटेल तो खाल; तिसर्‍या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.


पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर.


तुम्ही कदाचित म्हणाल, ‘सातव्या वर्षी आम्ही काही पेरायचे नाही व शेताचे उत्पन्न जमा करायचे नाही तर मग आम्ही त्या वर्षी काय खावे?’


पण सहाव्या वर्षी मी तुम्हांला अशी बरकत देईन की जमीन तुम्हांला तीन वर्षांचे उत्पन्न देईल.


आपोआप उगवलेले धान्य कापू नये आणि न छाटलेल्या द्राक्षवेलीची फळे तोडू नयेत; देशाच्या परमविश्रामाचे ते वर्ष असावे.


तुमचे पशू व तुमच्या देशातील जनावरे ह्यांना देशाचे सर्व उत्पन्न खायला मिळेल.


तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही समाईक होते.


तेव्हा विश्वास धरणार्‍यांचा समुदाय एकदिलाचा व एकजिवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्वकाही समाईक होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan