लेवीय 24:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 दर शब्बाथवारी त्याने परमेश्वरासमोर त्या नित्यनेमाने मांडाव्यात; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 प्रत्येक शब्बाथ दिवशी अहरोनाने त्या, परमेश्वरासमोर मांडाव्या; इस्राएल लोकांच्या वतीने हा सर्वकाळचा करार होय. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे. Faic an caibideil |
पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ एक मंदिर बांधत आहे. ते परमेश्वराला समर्पण करून त्याच्यासमोर सुगंधी द्रव्यांनी युक्त असा धूप जाळावा, नित्य समर्पित भाकर तेथे ठेवावी आणि रोज सकाळी व संध्याकाळी, शब्बाथदिनी व चंद्रदर्शनी आणि आमचा देव परमेश्वर ह्याने नेमलेल्या पर्वकाळी होमबली अर्पावेत म्हणून ते मी बांधत आहे. इस्राएलाचा हा निरंतरचा विधी होय.