Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 23:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डाहळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्याच्यासमोर सात दिवस उत्सव करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 पहिल्या दिवशी तुम्ही झाडांची चांगली फळे, खजुरीच्या झावळ्या दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या आणि ओहळालगतचे वाळूंज ही घेऊन तुमचा देव परमेश्वर यासमोर सात दिवस उत्सव करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 23:40
19 Iomraidhean Croise  

तेथील वाळुंजांवर आम्ही आपल्या वीणा टांगून ठेवल्या,


नीतिमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.


मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.


वाहत्या पाण्याजवळ जसे वाळुंज उगवते, तसे ते गवतामध्ये उगवतील.


यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्लासा; तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा;


जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून पुढे सात दिवसपर्यंत परमेश्वराप्रीत्यर्थ सण पाळावा; पहिला दिवस व आठवा दिवस हे परमविश्रामदिन होत.


प्रतिवर्षी सात दिवस परमेश्वराप्रीत्यर्थ हा सण पाळावा; तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय; सातव्या महिन्यात हा सण पाळावा.


तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; काही झाडांच्या डाहळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते.


खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’ इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’


ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही.


इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो.


तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा; तुमच्या वेशींच्या आत राहणार्‍या लेव्यासहित आनंद करावा, कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही.


तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा.


कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरवसा न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत.


प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा म्हणेन, आनंद करा.


त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.


ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan