Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 23:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 सहा दिवस कामकाज करावे, पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्बाथ व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व घराघरांतून हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 23:3
17 Iomraidhean Croise  

तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराचे सांगणे असे आहे की, उद्या विसाव्याचा दिवस, परमेश्वराचा पवित्र शब्बाथ आहे; तुम्हांला भाजायचे ते भाजा आणि शिजवायचे ते शिजवा. जे काही उरेल ते आपल्यासाठी सकाळपर्यंत ठेवा.”


पाहा, परमेश्वराने तुम्हांला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हांला दोन दिवसांचे अन्न देतो. सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.”


ह्याप्रमाणे लोकांनी सातव्या दिवशी विसावा घेतला.


सहा दिवस तू आपला उद्योग कर व सातव्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि तुझे गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरा ह्यांचा जीव ताजातवाना होईल.


सहा दिवस तू आपले कामकाज कर, पण सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे.


जो मानव हे करतो व जो मानवपुत्र ह्याला धरून राहतो, जो शब्बाथ पाळतो, काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो तो धन्य!”


तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात,


तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस;


तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे.


येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, “ज्यांत काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत; तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.”


मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्ये व सुवासिक तेले तयार केली. शब्बाथ दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या.


कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”


प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्यामागे कर्ण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan