Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 23:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 “त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्यादिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करून नम्र व्हावे व परमेश्वरास अर्पण अर्पावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 “सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 23:27
19 Iomraidhean Croise  

मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


मी तर त्यांच्या आजारात गोणपाट नेसत असे; मी उपास करून आपल्या जिवाला क्लेश देत असे; माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली.


अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या शिंगासाठी1 प्रायश्‍चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्‍चित्ता-साठी अर्पण केलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्‍चित्त करावे; ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय. जिवाच्या खंडणीसाठी द्यायचा पैसा


मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?


अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे;


मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकर्‍याचा वध करावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोर्‍ह्याच्या रक्ताचे केले तसेच बकर्‍याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.


आणखी त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता आणि अपराध ह्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्या एकंदर पापांबद्दल पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; लोकांच्या अशुद्धतेने व्याप्त होऊन त्यांच्याबरोबर वसत असलेल्या दर्शन-मंडपासाठी त्याने तसेच करावे.


मग त्याने एखाद्या पवित्र स्थळी पाण्याने स्नान करावे व आपली वस्त्रे घालून बाहेर जाऊन स्वतःसाठी व लोकांसाठी होमार्पण करून स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त करावे.


परमेश्वराने मोशेला सांगितले,


त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्‍चित्ताचा दिवस होय; त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी प्रायश्‍चित्त करण्यात येईल.


मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्‍चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे.


आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेमेच्या रहिवाशांवर कृपा व विनवणी ह्यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन आणि ज्या मला त्यांनी विंधले त्या माझ्याकडे2 ते पाहतील; एकुलत्या एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्याच्यासाठी शोक करतील; ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील.


तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्या वेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते, म्हणून पौल त्यांना असे सुचवत होता की,


कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan