Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 23:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना सांग, पवित्र मेळे भरवण्यासाठी परमेश्वराचे जे नेमलेले समय तुम्ही जाहीर करायचे ते माझे नेमलेले समय असे :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “इस्राएल लोकांस असे सांग. परमेश्वराने नेमलेल सण, पवित्र मेळे भरवण्यासाठी म्हणून तुम्ही जाहीर करावे; ते माझे नेमलेले पवित्रसण आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 23:2
28 Iomraidhean Croise  

येहू म्हणाला, “बआलाप्रीत्यर्थ एक पवित्र महासभा भरवा.” तेव्हा लोकांनी दवंडी पिटली.


तसेच शब्बाथाच्या व चंद्रदर्शनाच्या दिवशी व नेमलेल्या पर्वणीस ठरवलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरासमोर उभे राहून सर्व होमबली त्यांना त्यास अर्पावे लागत.


शलमोनाने सोरेचा राजा हूराम1 ह्याला सांगून पाठवले की, “माझा बाप दावीद ह्याच्याशी आपण जसा व्यवहार केला व त्याचे निवासमंदिर बांधण्यासाठी गंधसरू पाठवले तसाच व्यवहार माझ्याशी करा.


लोकांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ यरुशलेमेस येऊन वल्हांडण सण पाळावा असा डांगोरा बैर-शेब्यापासून दानापर्यंत सर्व इस्राएलात पिटवावा असा त्यांनी ठराव केला, ह्या प्रकारे एवढ्या मोठ्या समुदायाने हा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला नव्हता.


नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पण केले.


शुक्ल प्रतिपदेस, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवशी कर्णा वाजवा.


हे पाहून अहरोनाने त्याच्यापुढे एक वेदी बांधली आणि असे जाहीर केले की, उद्या परमेश्वराप्रीत्यर्थ उत्सव करायचा आहे.


आमचे मेळे भरवण्याची सीयोन नगरी पाहा; यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल; जो कधी हलवत नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल.


पर्वणीस जाणारे कोणी नाहीत म्हणून सीयोनेचे मार्ग शोक करीत आहेत; तिच्या सर्व वेशी उजाड झाल्या आहेत; तिचे याजक उसासे टाकत आहेत; तिच्या कुमारी खिन्न झाल्या आहेत; ती स्वतः कष्टी आहे.


तंट्याबखेड्यांचा निवाडा करण्यास त्यांनी तत्पर असावे; माझ्या निर्णयांप्रमाणे हा निवाडा त्यांनी करावा; सर्व सणांत माझे विधी व नियम पाळावेत आणि माझ्या शब्बाथांचे पवित्रपणे पालन करावे.


तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.


उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात वडिलांना व देशात राहणार्‍या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा.


सीयोनात कर्णा वाजवा; उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की, आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये; तुमच्या सर्व निवासस्थानांतून तुम्हांला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


परमेश्वराचे नेमलेले समय हे होत. त्यांत हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण त्या त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पण करण्यासाठी पवित्र मेळे भरवावेत असे तुम्ही जाहीर करावे;


परमेश्वराचे जे नेमलेले समय म्हणजे पवित्र मेळ्याचे दिवस तुम्ही नियमित वेळी जाहीर करायचे ते हे :


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणाचे बली अर्पण करत असताना हे कर्णे वाजवावेत; ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.”


तुमचे नवस व स्वखुशीची अर्पणे ह्यांखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली, अन्नार्पणे, पेयार्पणे आणि शांत्यर्पणे परमेश्वराला अर्पावीत.”


त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला.


कारण तुमच्यासाठी, लावदिकीया येथील लोकांसाठी, व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे, हे तुम्हांला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे.


तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan