Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 22:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे, मेंढरे अथवा बकर्‍या ह्यांतील दोषहीन नर अर्पण करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्‍हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 22:19
21 Iomraidhean Croise  

कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;


शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.


“इस्राएल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांतला अर्पावा.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये; मग तो आंधळा असो, लंगडा असो, बसक्या नाकाचा असो, एखादा अवयव अधिक लांब असलेला असो,


त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी.


तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये; कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या.”


ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलाताने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, “मी ह्या [नीतिमान] मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पाहा.”


“मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”


शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप व घडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले व “खरोखर हा देवाचा पुत्र होता,” असे म्हणाले.


“हा मनुष्य लोकांना फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले; आणि पाहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्यासमक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही;


आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही.”


तेव्हा जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करून म्हटले, “खरोखर हा मनुष्य नीतिमान होता.”


तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, “पाहा, त्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो.”


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.


पण त्यांतील एखाद्यात काही दोष असला, म्हणजे तो लंगडा किंवा आंधळा असला किंवा त्याच्यात दुसरे कोणतेही व्यंग असले तर त्याचे अर्पण तुझा देव परमेश्वर ह्याला करू नकोस.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan