Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 22:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 “अहरोन, त्याचे मुलगे व सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, तुम्हा इस्राएल लोकांपैकी अथवा तुमच्यामध्ये राहणार्‍या उपर्‍या लोकांपैकी कोणी आपल्या नवसाच्या अथवा स्वखुशीच्या यज्ञबलीचा परमेश्वराप्रीत्यर्थ होम करील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अहरोन, त्याचे पुत्र व सर्व इस्राएल लोक ह्याना सांग की तुम्हा इस्राएल लोकांपैकी किंवा तुम्हामध्ये राहणाऱ्या उपरी लोकांपैकी कोणाला आपल्या नवसाचा किंवा काही विशेष कारणासाठी स्वखुशीचा परमेश्वरासाठी यज्ञबली अर्पावयाचा असेल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 “अहरोन, त्याचे पुत्र व इस्राएली लोकांना सांग, ‘जर तुमच्यापैकी—इस्राएली लोकांपैकी किंवा इस्राएलात राहणारे विदेशी यापैकी कोणीही—याहवेहला वचनपूर्तीचे किंवा स्वैच्छिक होमार्पण आणले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 22:18
29 Iomraidhean Croise  

परमेश्वराला केलेली अर्पणे व परमपवित्र वस्तू ह्यांची वाटणी करता यावी म्हणून इम्ना लेवी ह्याचा पुत्र कोरे जो पूर्ववेशीचा द्वारपाल होता त्याला स्वेच्छार्पणांची देखरेख करण्यासाठी नेमले होते.


परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.


परमेश्वराला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.


महामंडळात तुझ्यामुळेच मी स्तवन करतो; त्याच्या भक्तांसमक्ष मी आपले नवस फेडीन.


हे देवा, तुझ्या नवसांचे ऋण माझ्यावर आहे; मी तुला आभाररूपी अर्पणे वाहीन.


कारण, हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; तुझ्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तू मला दिले आहेस;


म्हणजे तुझ्या नावाची स्तोत्रे निरंतर गाऊन मी आपले नवस नित्य फेडत राहीन.


हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते.


मी होमार्पणे घेऊन तुझ्या मंदिरात येईन, तुला केलेले नवस फेडीन;


कोकरू घ्यायचे ते निर्दोष असावे. तो एक वर्षाचा नर असावा; हा नर मेंढरांतला किंवा शेरडांतला, तुम्हांला वाटेल तो घ्यावा;


तू देवाला नवस केला असल्यास तो फेडण्यास विलंब करू नकोस, कारण देव मूर्खावर प्रसन्न होत नसतो; जो नवस तू केला असेल त्याची फेड कर.


शेरडामेंढरांतले होमार्पण करायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा.


“इस्राएल लोकांना असे सांग की तुमच्यापैकी कोणी मनुष्य परमेश्वराला पशुबली अर्पील तेव्हा त्याने तो गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांतला अर्पावा.


इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणार्‍या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन.


इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली, तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बाथ पाळावेत, भेटी अर्पाव्यात, सर्व नवस फेडावेत आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावीत.


पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पण करील त्या दिवशी ते खावे; आणि जे काही त्यातले उरेल ते दुसर्‍या दिवशीही खावे;


खमीर घातलेल्या भाकरींची अर्पणे ईशोपकारस्मरणासाठी होमरूपे अर्पा. स्वसंतोषाने केलेल्या अर्पणांचा पुकारा करा, ती सर्वांना ऐकवा; इस्राएलवंशजहो, तुम्हांला हे आवडते, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


त्या माणसांना तर परमेश्वराचा फार धाक पडला; त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला व नवसही केले.


पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


आपल्या कळपात नर असून त्याचा नवस केल्यावर कोणी सदोष पशूचा यज्ञ करतो; असा फसवणारा शापित असो. मी थोर राजा आहे व राष्ट्रांत माझ्या नावाची भीती धरतात, असे परमेश्वर म्हणतो.


आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरेढोरे किंवा शेरडेमेंढरे ह्यांचे परमेश्वराप्रीत्यर्थ हवन कराल, मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमलेल्या सणातला तो यज्ञ असो,


ह्यानंतर पौल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधुजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूरिया देशात गेला. त्याच्याबरोबर प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला हे गेले. त्याचा नवस होता म्हणून त्याने किंख्रियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले.


आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश, आपली गुरेढोरे अथवा शेरडेमेढरे ह्यांचे प्रथमवत्स, नवसफेडीची वस्तू अथवा स्वसंतोषाची अर्पणे व स्वहस्ते समर्पित करायचे आपले अर्पण ही आपल्या वेशीच्या आत तुम्ही खाऊ नयेत;


आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करायची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडामेंढरांचे प्रथमवत्स आणावेत;


मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वसंतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ सप्ताहांचा सण पाळ.


Lean sinn:

Sanasan


Sanasan