Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 22:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 याजकाची मुलगी विधवा असली अथवा नवर्‍याने टाकलेली असली, आणि ती विनापत्य असून तरुणपणी होती तशीच आपल्या बापाच्या घरी परत येऊन राहत असली तर तिने आपल्या बापाचे अन्न खावे; पण कोणा परक्याने ते खाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 याजकाची मुलगी विधवा झाली असेल किंवा तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिले असेल, तिला एकही मूल झालेले नसेल व परत ती तरुणपणी होती तशीच आपल्या वडिलाच्या घरी राहत असेल तर मग आपल्या वडिलाच्या म्हणजे याजकाच्या घरातील पवित्र अन्नातून तिने खावे, परंतु याजकाच्या घरचे पवित्र अन्न फक्त त्याच्या कुटुंबातील लोकांनीच खावे परकियाने खाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 पण जर याजकाची मुलगी विधवा किंवा पतीने सोडलेली असून तिला पुत्र नसेल आणि ती तरुणपणी पुन्हा आपल्या पित्याच्या घरात येऊन राहत असेल, तर मात्र तिने आपल्या पित्याच्या घरातील अन्न खावे. तथापि, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने हे अन्न खाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 22:13
11 Iomraidhean Croise  

यहूदा आपली सून तामार हिला म्हणाला, “माझा मुलगा शेला वयात येईपर्यंत आपल्या बापाच्या घरी वैधव्यदशेत राहा.” त्याला वाटले की शेलाही आपल्या मुलांप्रमाणे मरायचा. मग तामार आपल्या बापाच्या घरी जाऊन राहिली.


तिर्शाथा1 त्यांना म्हणाला, “उरीम व थुम्मीम धारण करणार्‍या याजकाची स्थापना होईपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र पदार्थ खाण्यास पात्र नाही.”


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला, “वल्हांडण सणाचा विधी असा : परदेशीयांपैकी कोणी त्यातले काही खाऊ नये;


त्यांचा संस्कार व पवित्रीकरण ह्यांसाठी ज्या पदार्थांनी प्रायश्‍चित्त झाले ते पदार्थ त्यांनी खावेत, पण कोणा परक्याने ते खाऊ नयेत, कारण ते पदार्थ पवित्र आहेत.


तुम्ही माझ्या पवित्र वस्तूंची राखण केली नाही, तर तुम्ही माझ्या पवित्रस्थानात आपल्याऐवजी त्यांना माझ्या पवित्र वस्तूंचे राखणदार नेमले.


ओवाळलेला ऊर आणि समर्पित केलेली मांडी ही तुम्ही, म्हणजे तू व तुझ्यासहित तुझे मुलगे व मुली ह्यांनी एखाद्या स्वच्छ स्थळी खावी; कारण इस्राएल लोकांनी केलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञांपैकी तुला व तुझ्या मुलाबाळांना ती हक्क म्हणून दिली आहेत.


कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत.


याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत.


त्याच्या घरून बाहेर निघाल्यावर तिने जाऊन पाहिजे तर दुसरा नवरा करावा;


त्या दिवशी तेथे शौलाचा दवेग नावाचा एक सेवक परमेश्वरासमोर खोळंबून राहिला होता; तो अदोमी असून शौलाच्या गुराख्यांचा प्रमुख होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan