Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 21:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तू त्याला पवित्र मानावे कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पण करतो; त्याला तू पवित्र लेखावे, कारण तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्यास पवित्र मानावे, त्यास तू पवित्र लेखावे; कारण तुम्हास पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 21:8
18 Iomraidhean Croise  

हे माझ्या देवा, त्यांनी याजकपद भ्रष्ट केले आहे आणि याजकवृत्तीचा व लेवीवृत्तीचा करार मोडला आहे, म्हणून त्यांची आठवण ठेव.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावेत.


मग मोशे पर्वतावरून उतरून लोकांकडे आला; त्याने लोकांना पवित्र केले आणि त्यांनी आपले कपडे धुतले.


तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना ही वस्त्रे चढवून त्यांना अभिषेक करावा. त्यांच्यावर संस्कार करावा, आणि त्यांना पवित्र करावे म्हणजे ते याजक ह्या नात्याने माझी सेवा करतील.


त्यांनी याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी जे तुला करायचे ते हे : एक गोर्‍हा आणि दोन दोषहीन मेंढे घ्यावेत,


“इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.


त्यांनी आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये; ते परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करीत असतात; म्हणून त्यांनी पवित्र राहावे.


पवित्र पदार्थ खाल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल; त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


आणि ह्याचा याजकाने वेदीवर होम करावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्यान्न होय.


तुम्ही माझ्या वेदीवर विटाळलेली भाकर चढवता. तरी तुम्ही विचारता, ‘आम्ही कोणत्या प्रकारे तुला विटाळले?’ तुम्ही म्हणता, ‘परमेश्वराचे मेज तुच्छ आहे;’ असे तुम्ही बोलता तेणेकरून तुम्ही ते विटाळवता.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.


तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?


आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो.


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते?


असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते; तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा व आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan