Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 21:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्याने स्वजनांमध्ये आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये, कारण त्याला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 अशा प्रकारे त्याने आपल्या लोकात आपली संतती भ्रष्ट होऊ देऊ नये; कारण मी जो परमेश्वर त्या मी त्यास पवित्र सेवेसाठी पवित्र केले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 21:15
16 Iomraidhean Croise  

मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्‍चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”


ह्या सर्वांनी आपापल्या वंशावळींचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधला पण त्यांना तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजकपदावरून भ्रष्ट झाले.


त्यांनी आपणांस व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत; पवित्र बीज देशोदेशीच्या लोकांत मिसळून गेले आहे; सरदार व शास्ते ह्यांचा हात ह्या पातकात प्रमुख आहे.”


त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरता बायका करून घेशील, आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील.


“इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.


म्हणून तुम्ही आपल्याला पावन करून पवित्र व्हा; कारण मी परमेश्वर तुमचा देव आहे.


विधवा, टाकलेली स्त्री, भ्रष्ट झालेली स्त्री अथवा वेश्या ह्यांच्यापैकी कोणालाही त्याने बायको करून घेऊ नये, तर त्याने आपल्या स्वजनातील एखाद्या कुमारिकेशीच विवाह करावा.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


तू त्याला पवित्र मानावे कारण तो तुझ्या देवासाठी अन्न अर्पण करतो; त्याला तू पवित्र लेखावे, कारण तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर पवित्र आहे.


पवित्र पदार्थ खाल्ल्याच्या अपराधाबद्दल त्यांना दोषार्पण करावे लागेल; त्याला याजकांनी कारणीभूत होऊ नये; कारण त्यांना पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”


यहूदा विश्वासघात करत आहे, इस्राएलमध्ये व यरुशलेमेत एक अमंगळ प्रकार घडला आहे; म्हणजे यहूदाने परमेश्वराला प्रिय असलेले त्याचे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे, व परक्या दैवताच्या कन्येबरोबर विवाह केला आहे.


ज्याच्या ठायी आत्म्याचा थोडातरी अंश आहे अशा कोणीही असे कधी केले नाही; देवाला अनुसरणार्‍या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? ह्याकरता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये.


अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, ह्यांतून मोठे कोणते? ते सोने किंवा ज्याच्या योगाने ते सोने पवित्र झाले ते मंदिर?


कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.


कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan