लेवीय 21:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आपल्या भावांमध्ये जो मुख्य याजक आहे, ज्याच्या मस्तकाला अभिषेकाच्या तेलाचा अभ्यंग झाला आहे आणि पवित्र वस्त्रे परिधान करण्यासाठी ज्याच्यावर संस्कार झाला आहे, त्याने आपल्या डोक्याचे केस सोडू नयेत व आपली वस्त्रे फाडू नयेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांमध्ये शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “ ‘प्रमुख याजक, म्हणजे ज्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतण्यात आले आहे व जो याजकीय वस्त्रे घालण्यास पवित्र करण्यात आला आहे, त्याने शोक व्यक्त करण्याकरिता आपले केस मोकळे सोडू नयेत किंवा आपली वस्त्रे फाडू नये. Faic an caibideil |