Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 20:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आपल्या बापाला अथवा आईला जो शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे; जो आपल्या बापाला अथवा आईला शिव्याशाप देईल त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जिवे मारावे त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “ ‘जो कोणी आपल्या वडिलांना किंवा आईला शाप देतो, त्याला अवश्य जिवे मारावे, कारण त्याने स्वतःच्या आईवडिलांना शाप दिला आहे, त्याच्या रक्ताचा दोष त्याच्याच माथी राहील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 20:9
17 Iomraidhean Croise  

दावीद त्याला म्हणाला, “तुझा रक्तपात तुझ्याच माथी असो; परमेश्वराच्या अभिषिक्ताचा मी वध केला असे म्हटल्याने तुझ्याच मुखाने तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे.”


त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.


कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिले तर त्याला अवश्य जिवे मारावे.


जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल.


बापाला शाप देणारा व “तुला आशीर्वाद प्राप्त होवो” असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे.


जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्‍यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील.


वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल काय? तो वाचायचा नाही; त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत; तो खातरीने मरेल; त्याने केलेला रक्तपात त्याच्यावरच उलटेल.


तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.


कोणी स्त्री कुकर्म करायला एखाद्या पशूकडे जाईल तर त्या स्त्रीला व त्या पशूला मारून टाकावे; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे, त्यांना दगडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’


सर्व लोकांनी उत्तर दिले की, “त्याचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबाळांवर असो.”


कारण मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख’ आणि ‘जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’


‘जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


कोणी तुझ्या घराबाहेर रस्त्यावर गेला तर त्याच्या रक्तपाताचा दोष त्याच्याच माथी राहील, आमच्यावर त्याचा दोष येणार नाही; पण घरात तुझ्याबरोबर जो असेल त्याच्यावर कोणी हात टाकला तर त्याच्या रक्तपाताचा दोष आमच्या माथी राहील.


यरुब्बालाच्या सत्तर मुलांचा घात करणारा त्यांचा भाऊ अबीमलेख आणि त्याच्या भावांची कत्तल करण्यास त्याला हातभार लावणारे शखेमकर ह्यांच्यावर दोष ठेवून ह्या खुनाचा बदला घ्यावा ह्या हेतूने देवाने असे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan