लेवीय 20:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मीही त्या मनुष्याला विन्मुख होऊन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन; कारण त्याने आपले अपत्य मोलखास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मीही त्या मनुष्याच्या विरूद्ध होईन! आणि त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला! Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मी स्वतः त्या मनुष्याच्या विरुद्ध माझे मुख फिरवेन व लोकातून त्याच्या उच्छेद करेन; कारण त्याने आपले मूल मोलख दैवताला बळी देऊन व माझे पवित्रस्थान भ्रष्ट करून माझ्या पवित्र नावाचा अपमान केला आहे. Faic an caibideil |