Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 20:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना आणखी असे सांग की, इस्राएल लोकांपैकी अथवा इस्राएल लोकांमध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी आपले अपत्य मोलखास अर्पण केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; आपल्या देशाच्या लोकांनी त्याला दगडमार करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “तू इस्राएल लोकांस आणखी असे सांग की, इस्राएलांपैकी किंवा इस्राएल लोकांमध्ये राहणाऱ्या परकियांपैकी कोणी आपल्या मुलाबाळांतून एखादे मूल मोलख दैवतास अर्पील तर त्या मनुष्यास जिवे मारावे! आपल्या देशाच्या लोकांनी त्यास धोंडमार करावा!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांना सांग: इस्राएली लोकांपैकी कोणीही किंवा तुमच्यात राहणाऱ्या कोणत्याही परदेश्याने त्याच्या मुलाचे अर्पण मोलख दैवतासाठी केले, तर समुदायातील सभासदांनी त्याला दगडमार करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 20:2
33 Iomraidhean Croise  

तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले.


त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे अग्नीत होम करून त्यांचे अर्पण केले; ते शकुनमुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्याला संताप येतो ते करण्यासाठी त्यांनी आपल्याला वाहून घेतले.


नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.


त्याने हिम्मोनपुत्राच्या खोर्‍यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतींना अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पण केली.


त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


त्यांनी निरपराध्यांचा रक्तपात केला, म्हणजे आपले पुत्र व कन्या ह्यांचे रक्त पाडले; त्यांनी कनानाच्या मूर्तींना त्यांचे बळी दिले; असे करून त्यांनी रक्ताने भूमी विटाळली.


यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलखाच्या मूर्तीला आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्यात म्हणून बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधली; हे मी त्यांना आज्ञापिले नव्हते; ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.


आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती.


मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.


आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणांस विटाळवत आहात; असे असता मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाहीच.


कारण त्यांनी व्यभिचार केला आहे, त्यांच्या हातांना रक्त लागले आहे, त्यांनी आपल्या मूर्तींबरोबर व्यभिचार केला आहे आणि माझ्यापासून त्यांना झालेले पुत्र मूर्तींना भक्ष्य व्हावे म्हणून त्यांनी अग्नीत त्यांचे होम केले आहेत.


कारण त्यांनी आपल्या पुत्रांचा वध करून ते आपल्या मूर्तींना अर्पण केले, तेव्हा त्याच दिवशी त्या माझे पवित्रस्थान अपवित्र करण्यासाठी त्यांत आल्या; पाहा, माझ्या मंदिरांत त्यांनी असे वर्तन केले.


इस्राएल लोकांपैकी कोणी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीयांपैकी कोणी खाण्यालायक पशूची किंवा पक्ष्याची शिकार केली, तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.


कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो, मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारलेल्या पशूंचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुऊन पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे तो शुद्ध होईल.


तू त्यांना सांग की, इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,


आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नकोस, ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नकोस, मी परमेश्वर आहे.


परमेश्वर मोशेला म्हणाला,


कोणी पंचाक्षरी अथवा चेटूक करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जिवे मारावे, त्यांना दगडमार करावा; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


“तुम्ही त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर घेऊन जा आणि जितक्यांनी ती निंदा ऐकली तितक्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत; नंतर सर्व मंडळीने त्याला दगडमार करावा.


जो कोणी परमेश्वराच्या नावाची निंदा करील त्याला अवश्य जिवे मारावे; सर्व मंडळीने त्याला अवश्य दगडमार करावा; तो परदेशीय असो किंवा स्वदेशीय असो, त्याने परमेश्वराच्या नावाची निंदा केली तर त्याला जिवे मारावे.


मोशेने इस्राएल लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांनी त्या शिव्याशाप देणार्‍याला छावणीबाहेर नेऊन दगडमार केला. अशा प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी केले.


मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’, म्हणजे पुजण्याकरता ‘तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हांला’ बाबेलच्या ‘पलीकडे नेऊन ठेवीन.’


आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोस; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचादेखील होम करीत असतात.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या नगरात कोणी पुरुष अथवा स्त्री तुझा देव परमेश्वर ह्याचा करार मोडून त्याच्या दृष्टीने काही दुष्कृत्य करताना आढळून आले,


आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार,


मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.


वडीलवर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा; कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्राएलात भ्रष्टाचार केला आहे; ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan