Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 2:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वराप्रीत्यर्थ तुला अन्नार्पण म्हणून प्रथमउपज अर्पायचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसांतले दाणे, म्हणजे हिरव्या कणसांचे चोळून काढलेले दाणे प्रथमउपजाचे अन्नार्पण म्हणून आण.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 जर परमेश्वराकरीता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 “ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 2:14
16 Iomraidhean Croise  

काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले.


बआल-शालीशा येथील कोणी मनुष्य आपल्या प्रथमउपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्याला म्हणाला, “ह्या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे.”


त्यावर तेल ओत व धूप ठेव; हे अन्नार्पण होय.


चोळून काढलेले दाणे व तेल ह्यांपैकी काही भाग स्मारकभाग म्हणून सर्व धूपासहित याजकाने जाळावा; हे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य होय.


तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ कराल, तेव्हा तुमचा स्वीकार होईल अशा प्रकारे तो करा.


“इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;


त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या दोन दशमांश एफा सपिठाचे असावे; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून एक चतुर्थांश हिन द्राक्षारस अर्पावा.


याजकाने ती अर्पणे प्रथमउपजाच्या भाकरी-बरोबर त्या दोन मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावीत; ही परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असून याजकाच्या वाट्याची व्हावीत.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यान्न तुम्ही माझ्याप्रीत्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा.


तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्‍यांतले प्रथमफळ असा आहे.


आणि तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यातील जमिनीचे सर्व प्रकारचे प्रथमउत्पन्न तू घरी आणशील, तेव्हा त्यातले काही पाटीत घालून तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या नावाच्या निवासासाठी निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.


स्त्रीसंगाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्यामागे जाणारे ते हे आहेत. ते देवासाठी व कोकर्‍यासाठी प्रथमफळ असे माणसांतून विकत घेतलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan