Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 2:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 कोणाला परमेश्वराप्रीत्यर्थ अन्नार्पण करायचे असल्यास त्याने सपीठ अर्पावे; त्याच्यावर त्याने तेल ओतून वरती धूप ठेवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जेव्हा कोणी परमेश्वरासमोर अन्नार्पण घेऊन येईल, तेव्हा त्याने अर्पणासाठी सपीठ आणावे; त्याने त्यामध्ये तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 “ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 2:1
31 Iomraidhean Croise  

आणि बेखमीर भाकर, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; ह्या सर्व सपिठाच्या असाव्यात.


तू मला होमार्पण करण्यासाठी मेंढरे आणली नाहीत; आणि मला यज्ञ करून माझे गौरव केले नाही. मी तुझ्यावर अन्नार्पणांसाठी सक्ती केली नाही, धूपासाठी तुला त्रास दिला नाही.


परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.


तो मला म्हणाला, “याजक दोषार्पणाचे व पापार्पणाचे मांस शिजवतात ते हे स्थळ; अन्नार्पणही तेथेच भाजतात; त्यांनी ती बाहेरच्या अंगणात नेऊ नयेत, म्हणजे त्यांच्या स्पर्शाने लोक पवित्र होणार नाहीत.”


परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे; परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.


परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.


आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


प्रत्येक रांगेवर शुद्ध धूप ठेव म्हणजे तो त्या भाकरीचे परमेश्वराला स्मरण देणारे हव्य होईल.


दोन होले अथवा पारव्याची दोन पिलेदेखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या पापाबद्दल एक दशमांश एफा सपीठ पापार्पण म्हणून आणावे; त्याच्यावर त्याने तेल घालू नये किंवा धूप ठेवू नये, कारण हे पापार्पण होय.


याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.”


मग त्याने अन्नार्पण जवळ नेले व त्यातले मूठभर घेऊन त्याचा वेदीवर होम केला; सकाळच्या होमार्पणासह हेही अर्पण करण्यात आले.


आणि परमेश्वरासमोर शांत्यर्पणे करण्यासाठी एक बैल, एक मेंढा आणि तेलात मळलेले अन्नार्पण आणा, कारण आज परमेश्वर तुम्हांला दर्शन देणार आहे.”


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नीत होम करायचा नाही त्यांपैकी तुझ्या वस्तू ह्या : इस्राएल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नार्पणे, सर्व पापार्पणे आणि सर्व दोषार्पणे ते मला अर्पण करतील, ती तुझ्या व तुझ्या वंशजांप्रीत्यर्थ परमपवित्र होत.


आणि हातकुटीच्या पाव हिन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे अन्नार्पण करावे.


त्यांबरोबर गोर्‍ह्यांसाठी, मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या-त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधिपूर्वक करावीत;


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


मग त्यांनी एक गोर्‍हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे; आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोर्‍हा आणावा.


येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही.


जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.


तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.


प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा,


मग आणखी एक देवदूत येऊन ‘वेदीपुढे उभा राहिला’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह धूप’ ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan