Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 पिकल्या केसांसमोर उठून उभा राहा; वृद्धाला मान दे; आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 वडीलधाऱ्या मनुष्यांना मान द्या; वृद्ध मनुष्य घरात आल्यास उठून उभे राहा; आपल्या देवाचे भय बाळगा. मी परमेश्वर आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 “ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:32
15 Iomraidhean Croise  

ती बापाला म्हणाली, “स्वामी, मला आपल्यापुढे उठून उभे राहवत नाही म्हणून रागावू नका, कारण मला स्त्रीधर्म प्राप्त झाला आहे.” अशा प्रकारे त्याने शोध केला; पण त्याला त्या गृहदेवता सापडल्या नाहीत.


मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


बथशेबा अदोनीयाच्या वतीने शलमोन राजाकडे बोलायला गेली. राजा तिचे स्वागत करण्यासाठी उठला व तिला दंडवत घालून आपल्या सिंहासनावर जाऊन बसला; त्याने आपल्या आईसाठी एक आसन मांडायला सांगितले, व ती त्याच्या उजवीकडे बसली.


तर परमेश्वराने महासामर्थ्याने व हात लांब करून तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले त्याचे भय धरा, त्याची आराधना करा आणि त्यालाच बली अर्पा.


ते वयाने मोठे होते म्हणून अलीहू ईयोबाशी भाषण करायला मिळेपर्यंत थांबला होता.


मग बरखेल बूजी ह्याचा पुत्र अलीहू ह्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “मी अल्पवयी आहे व तुम्ही वयोवृद्ध आहात; म्हणून मी मुरवत धरली; आपले मत तुमच्यापुढे प्रकट करण्यास मी कचरलो.


पिकलेले केस शोभेचा मुकुट होत; नीतिमत्तेच्या मार्गाने चालल्याने तो प्राप्त होतो;


बल हे तरुणांना भूषण आहे; पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे.


तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.


हा त्याला व तो ह्याला, असे लोक एकमेकांना पिडतील; मुलगा वडिलांशी व हलका प्रतिष्ठितांशी दांडगाईने वर्तेल.


त्यांच्या हातांनी सरदार लटकवण्यात आले आहेत; प्रत्यक्ष वडील माणसांचा मान ठेवण्यात आला नाही.


बहिर्‍याला शिव्याशाप देऊ नकोस, किंवा ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नकोस, पण तू आपल्या देवाचे भय बाळग; मी परमेश्वर आहे.


ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.


वडील माणसाला टाकून बोलू नकोस, तर त्याला पित्यासमान समजून बोध कर.


सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan