Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचे भय बाळगावे आणि माझे शब्बाथ पाळावेत, मी परमेश्वर तुमचा देव आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे; मी तुमचा देव परमेश्वर आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:3
31 Iomraidhean Croise  

मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


तू त्यांना आपल्या पवित्र शब्बाथाचा परिचय करून दिला, आणि तुझा सेवक मोशे ह्याच्या हस्ते तू त्यांना आज्ञा, नियम व नियमशास्त्र ही विहित केली.


पाहा, परमेश्वराने तुम्हांला शब्बाथ दिला आहे म्हणून सहाव्या दिवशी तो तुम्हांला दोन दिवसांचे अन्न देतो. सातव्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी स्वस्थ असावे, आपले ठिकाण सोडून कोणीही बाहेर जाऊ नये.”


आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.


शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.


कोणी आपल्या बापाला किंवा आईला मारहाण केली तर त्याला अवश्य जिवे मारावे.


कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिले तर त्याला अवश्य जिवे मारावे.


माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नकोस;


तू आपल्या जन्मदात्या बापाचे ऐक, आपल्या वृद्ध झालेल्या आईला तू तुच्छ मानू नकोस.


बापाला शाप देणारा व “तुला आशीर्वाद प्राप्त होवो” असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे.


जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्‍यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील.


तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस;


आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.


मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपल्याला पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे; म्हणून तुम्ही जमिनीवर रांगत चालणार्‍या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे आपल्याला विटाळू नका.


मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे.


पंचाक्षर्‍यांच्या किंवा चेटक्यांच्या नादी लागू नका; त्यांच्यामागे लागून अशुद्ध होऊ नका; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुमच्याबरोबर राहणार्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वत:सारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


सहा दिवस कामकाज करावे, पण सातवा दिवस परमविश्रामाचा शब्बाथ व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये; तुमच्या सर्व घराघरांतून हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.


तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे.


“मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो; मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? असे त्याच्या नावाचा अपमान करणार्‍या तुम्हा याजकांना परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता, ‘आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला?’


‘जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या पित्याचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील आणि तुझे कल्याण होईल.


शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते आणि आपण त्यांची भीड धरत असू; तर आपण विशेषेकरून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan