Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 कोणी मृत झाल्यामुळे आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा आपले अंग गोंदवून घेऊ नका; मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 मृताची आठवण म्हणून अंगावर जखम करून घेऊ नका. आपले अंग गोंदवून घेऊ नका. मी परमेश्वर आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 “ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:28
18 Iomraidhean Croise  

ते मोठमोठ्याने हाका मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सुर्‍यांनी व भाल्यांनी आपल्याला घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले.


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


प्रत्येक डोके भादरले आहे; प्रत्येक दाढी मुंडली आहे; सर्वांच्या हातांवर घाव आहेत, कंबरांना गोणपाट आहे.


आपल्या डोक्याला घेरा राखू नका. आपल्या दाढीचे कोपरे छाटून ती विद्रूप करू नका.


तू आपल्या मुलीला वेश्या करून भ्रष्ट होऊ देऊ नकोस; नाहीतर वेश्यागमनामुळे देश अतिदुष्टपणाने व्यापून जाईल.


परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाचे मुलगे जे याजक, त्यांना असे सांग की, तुमच्या कुळातील कोणी मृत झाले तर तुमच्यापैकी कोणीही त्याचे सुतक धरू नये;


त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये; आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये;


त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडण करू नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत, किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत.


तो नेहमी, रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे.


म्हणून दुसर्‍या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” पण त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.”


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची मुले आहात. मृतासाठी आपल्या अंगावर वार करून घेऊ नका किंवा मुंडण करून घेऊ नका,


त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर येतो;’ आणि जे श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यांना, आणि जो कोणी त्याच्या नावाची खूण धारण करून घेतो त्याला ‘रात्रंदिवस’ विश्रांती मिळत नाही.”


त्यांच्यामागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, “जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो, आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो,


मग अग्निमिश्रित काचेच्या समुद्रासारखे काहीतरी माझ्या दृष्टीस पडले; श्वापदावर, त्याच्या मूर्तीवर व त्याच्या नामसंख्येवर जय मिळवलेले लोक हातांत देवाच्या वीणा घेऊन त्या काचेच्या समुद्रावर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले.


तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या ‘लोकांना’ वाईट व ‘घाणेरडे फोड आले.’


मग श्वापद धरले गेले आणि त्याच्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला; त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला नमन करणार्‍या लोकांना त्याच्यासमोर चिन्हे करून ठकवले होते. ह्या दोघांना ‘जळत्या गंधकाच्या’ अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले;


नंतर ‘मी राजासने पाहिली,’ त्यांच्यावर ‘कोणी बसले होते;’ त्यांना ‘न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता;’ आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळांवर व आपल्या हातांवर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेही पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan