Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका; तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका. तुम्ही काही जादूटोणा, मंत्रतंत्र व शकूनमुहूर्त ह्याच्याद्वारे भविष्य पाहण्याचा प्रयत्न करु नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “ ‘तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नये. “ ‘तुम्ही जादूटोणा करू नये किंवा शकुन पाहू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:26
22 Iomraidhean Croise  

ज्याने माझा धनी पितो व ज्याने शकुनही पाहतो तो हाच नव्हे काय? तुम्ही हे केले ते फार वाईट केले.”


तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.


त्यांनी आपले पुत्र व कन्या ह्यांचे अग्नीत होम करून त्यांचे अर्पण केले; ते शकुनमुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्याला संताप येतो ते करण्यासाठी त्यांनी आपल्याला वाहून घेतले.


त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


त्याने आपली मुले हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यात अग्नीत होम करून अर्पण केली; तो शकुनमुहूर्त मानत असे; जादूटोणा व मंत्रतंत्र करीत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले; मिसराच्या त्या जादुगारांनीसुद्धा आपल्या मंत्रतंत्रांच्या योगे तसाच प्रकार केला.


तेव्हा जादुगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले, त्यांनी मिसर देशावर बेडूक आणले.


परमेश्वर असे म्हणतो, “राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका; आकाशातील उत्पातांनी घाबरू नका; राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात.


खास्द्यांनी राजास उत्तर केले, “महाराजांची ही गोष्ट सांगेल असा कोणी मनुष्य सार्‍या दुनियेत नाही; असली गोष्ट ज्योतिष्यांना, मांत्रिकांना किंवा खास्द्यांना कोणाही थोर व पराक्रमी राजाने आजपर्यंत विचारली नाही.


मग पाचव्या वर्षी तुम्ही त्यांची फळे खावीत. असे केल्याने त्यांना तुमच्यासाठी पुष्कळ फळे येतील; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.”


तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्ष्याचे, जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये.


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा.


त्याचे रक्त मात्र सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे.


त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये, हे लक्षात ठेव; कारण रक्त हे जीवन होय; म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये;


मात्र त्याच्या रक्ताचे तू सेवन करू नयेस; तू ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावेस.


म्हणून ते लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, बैल व वासरे जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.


शौलाला कोणी असे सांगितले की, “लोक रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करीत आहेत,” तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे; एक मोठा दगड माझ्याकडे लवकर लोटून आणा.”


अवज्ञा जादुगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व कुलदेवतार्चन1 ह्यांसारखा आहे. तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan