Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नकोस; आपल्या शेजार्‍याची अवश्य कानउघाडणी कर, नाहीतर त्याच्यामुळे तुला पाप लागेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “ ‘तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली मनुष्याचा तुमच्या अंतःकरणात द्वेष करू नये. तुमच्या शेजार्‍याला उघडपणे ताकीद द्यावी म्हणजे तुम्ही त्यांच्या पापाचे सहभागी होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:17
23 Iomraidhean Croise  

याकोबाला आपल्या बापाने आशीर्वाद दिला त्यामुळे एसावाने त्याच्याशी वैर धरले; एसावाने आपल्या मनात म्हटले, “माझ्या बापाचे सुतक धरण्याचे दिवस जवळ आले आहेत; त्यानंतर मी आपला भाऊ याकोब ह्याला जिवे मारीन.


अबशालोम अम्मोनास बरेवाईट काही बोलला नाही; अम्मोनाने त्याची बहीण तामार भ्रष्ट केली म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरले.


मग यहूदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो, “तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बाथ दिवस पवित्र असा पाळत नाही, हे काय?


नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.


निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील.


तुम्ही स्वत: सांभाळा. तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्‍चात्ताप केला तर त्याला क्षमा कर.


जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत, हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करत असतात; इतकेच केवळ नव्हे तर त्या करणार्‍यांना संमतीही देतात.


तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही.


बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे.


अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा;


बाकीच्यांना भय वाटावे म्हणून पाप करणार्‍यांचा सर्वांसमक्ष निषेध कर.


उतावळीने कोणावर हात ठेवू नकोस, आणि दुसर्‍यांच्या पापात तुझे अंग असू नये; स्वतःला शुद्ध राख.


वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर.


ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,


ह्या गोष्टी सांगून बोध कर आणि अधिकारपूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुला तुच्छ मानू नये असे वाग.


पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो; तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.


मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan