Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 न्यायनिवाडा करताना अन्याय करू नकोस, गरिबाच्या गरिबीकडे पाहू नकोस आणि समर्थापुढे नमू नकोस; तर आपल्या शेजार्‍याचा न्याय निःस्पृहपणे कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 न्यायनिवाडा करताना कोणावर अन्याय करु नका तर योग्य न्याय द्या. न्यायदान करताना गरीब लोक व वजनदार लोक ह्याना विशेष मर्जी दाखवू नका. आपल्या शेजाऱ्याचा न्याय करताना योग्य तोच न्याय द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “ ‘न्याय देताना अन्याय करू नका; तुम्ही गरिबांमध्ये भेदभाव करू नये, उच्च लोकांच्या आदराचा तुमच्या निर्णयावर परिणाम होऊ नये, तर तुम्ही तुमच्या शेजार्‍याचा योग्य न्याय करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:15
20 Iomraidhean Croise  

तुम्ही त्याचे पक्षपाती होणार काय? देवाची वकिली करणार काय?


मी कोणाचा पक्ष धरणार नाही, कोणाची खुशामत करणार नाही.


जो अमिरांची भीड राखत नाही, जो श्रीमंताला गरिबांहून अधिक मानत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.) त्याला निर्दोष ठरवणे उचित होईल काय?


“तुम्ही कोठवर विपरीत न्याय कराल? कोठवर दुर्जनांची तरफदारी कराल? (सेला)


तसेच तू ह्या सर्व लोकांतून कर्तबगार, देवाचे भय धरणारे, विश्वासू, लाचलुचपतीचा द्वेष करणारे असे पुरुष निवडून घे आणि लोकांवर अधिकार चालवण्यासाठी त्यांना हजार-हजार, शंभर-शंभर, पन्नास-पन्नास, दहा-दहा जणांवर नायक म्हणून नेमून ठेव;


दुर्जनाचा पक्ष धरून नीतिमानाचा न्याय विपरीत करणे उचित नाही.


हीही सुज्ञाची वचने आहेत. तोंड पाहून न्याय करणे ठीक नाही.


आपले मुख उघड, नीतिमत्त्वाने न्याय कर; गरीब व कंगाल ह्यांना न्याय मिळू दे.


न्याय करण्यात, मोजणी करण्यात, तोलण्यात अथवा मापण्यात काही अन्याय करू नका.


वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”


तेव्हा पौल त्याला म्हणाला, “हे चुना लावलेल्या भिंती, तुला देव मारील; तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय?”


न्याय करताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे; एखादे प्रकरण तुम्हांला विशेष अवघड वाटले, तर ते माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी ते ऐकेन.’


कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही.


विपरीत न्याय करू नये, पक्षपात करू नये आणि लाच घेऊ नये, कारण लाच शहाण्यांचे डोळे आंधळे करते आणि नीतिमानाच्या दाव्यांचा विपर्यास करते.


‘जो उपरा, अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करतो तो शापित असो.’ तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan