Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुम्ही चोरी करु नये. कोणाला फसवू नये. एकमेकाशी कपटाने बोलू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “ ‘तुम्ही चोरी करू नये. “ ‘खोटे बोलू नये. “ ‘एकमेकांना फसवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 19:11
28 Iomraidhean Croise  

अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले; ते तिला म्हणाले, “अहीमास व योनाथान कोठे आहेत?” तेव्हा त्या स्त्रीने त्यांना म्हटले, “ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत.” त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेला गेले.


तेव्हा तो त्याला म्हणाला, “मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे; परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, ‘त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्नपाणी सेवन करील.”’ पण हे त्याचे सांगणे खोटे होते.


कपट करणार्‍याला माझ्या घरात थारा मिळणार नाही; असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही.


मी अधीरपणे म्हणालो की, “सर्व माणसे लबाड आहेत.”


चोरी करू नकोस.


आपल्या शेजार्‍याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.


आपल्या शेजार्‍याच्या घराचा लोभ धरू नकोस, आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस, आपल्या शेजार्‍याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस.


एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत.


कोणी शेजार्‍याजवळ पैसा किंवा काही माल ठेवायला दिला आणि त्याच्या घरातून तो चोरीस गेला, तर चोर सापडल्यास त्याच्या दुप्पट मोबदला चोराने द्यावा;


खोटी अफवा उठवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस.


आपल्या शेजार्‍याविरुद्ध विनाकारण साक्ष देऊ नकोस; तू आपल्या वाणीने ठकवू नकोस.


“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.


आपला द्राक्षमळाही झाडून सारा खुडू नकोस, तशीच द्राक्षमळ्यात पडलेली फळे गोळा करू नकोस, गरीब व उपरे ह्यांच्यासाठी ती राहू द्यावीत; मी परमेश्वर तुमचा देव आहे.


कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातही लिहिलेले आहे की, “तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.”


म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजार्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.


चोरी करणार्‍याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला देण्यास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उद्योग करत राहावे.


चोरी करू नकोस.


एकमेकांशी लबाडी करू नका; कारण तुम्ही जुन्या मनुष्याला त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे;


जारकर्मी, पुंमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे ह्यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे;


परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, ‘खून करणारे,’ जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास ‘अग्नीचे व गंधकाचे’ सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan