Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 18:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका; तसेच ज्या कनान देशात मी तुम्हांला घेऊन जात आहे, तेथील चालीरीतींना अनुसरून चालू नका व तेथील विधींप्रमाणे चालू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तुम्ही ज्या मिसर देशात राहत होता त्या देशातील रीतीरीवाजाप्रमाणे चालू नका! तसेच ज्या कनान देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्या देशातील चालीरीती प्रमाणेही तुम्ही चालू नका! त्यांचे विधी पाळू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही ज्या इजिप्त देशात राहिलात त्यांच्यासारखे वागू नका आणि मी तुम्हाला जिथे नेत आहे, त्या कनान देशाचे लोक जे करतात ते करू नका. त्यांच्या रीतिरिवाजाचे पालन करू नका.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 18:3
15 Iomraidhean Croise  

आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांचे नियम व इस्राएलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम ह्यांचे त्यांनी अवलंबन केले होते.


तर ते त्या राष्ट्रांत मिसळले, आणि त्यांचे आचार शिकले,


तेव्हा त्यांच्या देवांना तू नमन करू नयेस, त्यांची सेवा करू नयेस, आणि त्यांच्यासारखी कर्मे करू नयेस, तर त्यांना अगदी जमीनदोस्त करावेस आणि त्यांच्या स्तंभांचे तुकडेतुकडे करावेस.


मिसर देशातील आपली शिंदळकी तिने सोडून दिली नाही; तेथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले, त्यांनी तिची कौमार्यावस्थेतील स्तनाग्रे चुरली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला.


ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देणार आहे त्यांच्या चालीरीतींचे तुम्ही अनुकरण करू नये; त्यांनी असली सर्व कृत्ये केली म्हणून मला त्यांचा तिटकारा आला आहे;


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका.


त्यांच्या काष्ठपाषाणाच्या व सोन्यारुप्याच्या मूर्ती व इतर अमंगळ वस्तू तुम्ही पाहिल्या;


तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देईल, तेव्हा आपल्या मनात म्हणू नकोस की, ‘माझ्या पुण्याईमुळे परमेश्वराने मला हा देश वतन करून घेण्यास येथे आणले आहे’; खरे पाहता ह्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्यासमोरून घालवून देत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan