Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 18:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नकोस, ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नकोस, मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 तू तुझ्या लेकरांपैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नको. मी परमेश्वर आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 18:21
30 Iomraidhean Croise  

ह्याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सीदोन्यांची देवी अष्टोरेथ, मवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिलकोम ह्यांच्या भजनी लागले आहेत; ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत आणि शलमोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाहीत.


तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले.


तो इस्राएलाच्या राजांच्या मार्गाने चालला; ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवले होते त्यांच्या अमंगळ आचारांना अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पण केले.


आणि अव्वी येथील लोकांनी निभज व तर्ताक अशी दैवते बनवली; आणि सफरवी लोकांनी आपल्या मुलांचा, सफरव्यांची दैवते अद्रम्मेलेक व अनम्मेलेक ह्यांच्यापुढे अग्नीत होम करून ती अर्पण केली.


त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून तो अर्पण केला; तो शकुनमुहूर्त पाळत असे, जादूटोणा करत असे आणि भूतवैद्य व चेटकी ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.


नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.


त्याने हिम्मोनपुत्राच्या खोर्‍यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतींना अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पण केली.


आणि बआलदैवताप्रीत्यर्थ आपले पुत्र होमार्पण म्हणून अग्नीत होम करण्यासाठी त्यांनी उच्च स्थाने बांधली; अशी आज्ञा मी केली नव्हती, हे मी सांगितले नव्हते, हे माझ्या मनातही आले नव्हते.


यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलखाच्या मूर्तीला आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्यात म्हणून बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधली; हे मी त्यांना आज्ञापिले नव्हते; ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.


आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती.


मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.


आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणांस विटाळवत आहात; असे असता मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाहीच.


कारण त्यांनी व्यभिचार केला आहे, त्यांच्या हातांना रक्त लागले आहे, त्यांनी आपल्या मूर्तींबरोबर व्यभिचार केला आहे आणि माझ्यापासून त्यांना झालेले पुत्र मूर्तींना भक्ष्य व्हावे म्हणून त्यांनी अग्नीत त्यांचे होम केले आहेत.


माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.


त्यांनी आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये; ते परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करीत असतात; म्हणून त्यांनी पवित्र राहावे.


“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना सांग की, इस्राएल लोक ज्या पवित्र वस्तू मला समर्पण करतात त्यांच्यापासून त्यांनी दूर राहावे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावू नये; मी परमेश्वर आहे.


माझ्या पवित्र नावाला तुम्ही कलंक लावू नये; पण इस्राएल लोकांमध्ये मला पवित्र मानण्यात येईल; तुम्हांला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.


तू इस्राएल लोकांना सांग की, जो कोणी आपल्या देवाला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी.


ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.


तुम्ही आपल्या राजाचा मंडप, आपल्या मूर्तीचा देव्हारा व तुम्ही केलेल्या आपल्या देवाचा तारा ही तुम्ही वाहून न्याल.1


हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या ह्यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय?”


पण तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळले आहे; त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न हे तुच्छ आहे; अशाने तुम्ही माझ्या नावाची अप्रतिष्ठा करता.


मोलखाचा मंडप व रेफान दैवताचा तारा’, म्हणजे पुजण्याकरता ‘तुम्ही ज्या प्रतिमा केल्या त्या तुम्ही उचलून घेतल्या; मीही तुम्हांला’ बाबेलच्या ‘पलीकडे नेऊन ठेवीन.’


आणि अविनाशी देवाच्या गौरवाची, नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमांच्या रूपांशी त्यांनी अदलाबदल केली.


“तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे.


आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोस; कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत; ते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचादेखील होम करीत असतात.


आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार,


Lean sinn:

Sanasan


Sanasan