Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 17:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्याचा हेतू असा की, इस्राएल लोक जे आपले यज्ञपशू खुल्या मैदानात मारत असतात, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणे म्हणून अर्पावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 या नियमाचा हेतू असा की इस्राएल लोक आपले पशू खुल्या शेतात मारतात ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणावे, व परमेश्वराकरिता शांत्यर्पणे म्हणून अर्पावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 17:5
20 Iomraidhean Croise  

मग अब्राहामाने बैर-शेबा येथे एशेल वृक्ष लावला आणि तेथे सनातन देव परमेश्वर ह्याच्या नावाने प्रार्थना केली.


तेव्हा अब्राहामाने दृष्टी वर करून पाहिले तेव्हा आपल्यामागे झुडपात शिंगे गुंतलेला एक एडका त्याला दिसला. मग अब्राहामाने तो एडका घेऊन आपल्या पुत्राच्या ऐवजी अर्पण केला.


देव म्हणाला, “तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक ह्याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”


नंतर याकोबाने डोंगरावर यज्ञ केला. आणि आपल्या भाऊबंदांना भोजनास बोलावले; त्यांनी भोजन करून त्या डोंगरावर रात्र घालवली.


त्यांनी प्रत्येक उंच टेकडीवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली उच्च स्थाने, स्तंभ आणि अशेरा मूर्ती स्थापल्या.


त्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्याकारणाने लोकांना उच्च स्थानी यज्ञयाग करावे लागत.


शलमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते; आपला बाप दावीद ह्याने अनुसरलेल्या नियमांप्रमाणे तो चालत असे; पण तो उच्च स्थानी यज्ञयाग करी व धूप जाळीत असे.


तो उच्च स्थानी, पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करत असे व धूप जाळत असे.


त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरामूर्ती स्थापन केल्या;


तो उच्च स्थानी, टेकड्यांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करी व धूप जाळी.


त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले, आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


तुझ्यात रक्तपात करण्यासाठी निंदक राहत आहेत, ते तुझ्यातल्या डोंगरावर मेजवानी करतात; तुझ्यात बदफैलीने चालतात.


ह्या दिवसांच्या कार्याची समाप्ती झाल्यावर आठव्या दिवशी व त्यापुढे याजक तुमची होमार्पणे व तुमची शांत्यर्पणे वेदीवर अर्पण करतील आणि मी तुमच्यावर प्रसन्न होईन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


इस्राएल वंशज मला सोडून बहकून गेले तेव्हा लेवी याजकांपैकी सादोक वंशज ह्यांनी माझ्या पवित्रस्थानाची सेवाचाकरी केली, म्हणून ते माझ्यासमीप येऊन माझी सेवा करतील, माझ्यासमोर उभे राहतील व मला चरबी व रक्त अर्पण करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो;


पण परमेश्वराच्या निवासमंडपासमोर परमेश्वराला अर्पण करायला तो दर्शनमंडपाच्या दाराशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा;


याजकाने त्यांचे रक्त दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराच्या वेदीवर शिंपडावे आणि परमेश्वराला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.


जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल, त्यांतले लोक ज्या ज्या ठिकाणी, उंच डोंगरांवर, टेकड्यांवर आणि हरतर्‍हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा;


Lean sinn:

Sanasan


Sanasan