Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पण परमेश्वराच्या निवासमंडपासमोर परमेश्वराला अर्पण करायला तो दर्शनमंडपाच्या दाराशी आणला नाही, तर त्या माणसाला रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने रक्तपात केला म्हणून त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परंतु परमेश्वराच्या निवासमंडपासमोर अर्पण करण्यासाठी दर्शनमंडपापाशी आणला नाही, तर त्या मनुष्यास रक्तपात केल्याचा दोष लागेल; त्याने त्या प्राण्याचा वध करून रक्त सांडले आहे म्हणून त्या मनुष्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 17:4
30 Iomraidhean Croise  

कोणाची सुंता झाली नाही, म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा; त्याने माझा करार मोडला असे होईल.”


ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!


सात दिवस तुम्ही बेखमीर भाकर खावी; पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे; पहिल्या दिवसापासून सातव्या दिवसापर्यंत जो कोणी खमिराची भाकर खाईल त्याचा इस्राएलातून उच्छेद करावा.


सात दिवसपर्यंत तुमच्या घरात खमीर मुळीच नसावे; कारण एखादा खमिराचा पदार्थ जो कोणी खाईल, तो परदेशीय असो की स्वदेशीय असो, त्याचा इस्राएलाच्या मंडळीतून उच्छेद करावा.


जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”


कोणी वास घेण्याकरता असले काही तयार करील तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”


जो बैल कापतो तो मनुष्यवध करणारा होय; जो मेंढ्याचा यज्ञ करतो तो कुत्र्याची मान मोडणारा होय; जो अन्नार्पण करतो तो डुकराचे रक्त अर्पण करणारा होय; जो धूप दाखवतो तो मूर्तीचा धन्यवाद करणारा होय; ज्या अर्थी त्यांनी आपलेच मार्ग पसंत केले आहेत व अमंगळ पदार्थांनी त्यांचा जीव संतुष्ट होतो,


तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या उंच पर्वतावर, इस्राएलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो; तेथे मी त्यांचा अंगीकार करीन; तेथे तुमच्याजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पित केलेल्या सर्व वस्तू मी मागेन.


गुराढोरांतले होमार्पण अर्पायचे असल्यास त्याने दोषहीन नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापुढे अर्पावा, म्हणजे परमेश्वरासमोर तो मनुष्य मान्य होईल.


इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणार्‍या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन.


कारण प्राणिमात्रांच्या जीवनाविषयी म्हणाल तर त्यांचे रक्त हेच त्यांचे जीवन होय; ह्यास्तव इस्राएल लोकांना मी म्हटले आहे की, कोणत्याही प्राण्याचे रक्त सेवन करू नये, कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्त होय; ते जो कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा.


इस्राएल घराण्यातील एखाद्या माणसाने छावणीत किंवा छावणीबाहेर बकरा मारला,


ह्याचा हेतू असा की, इस्राएल लोक जे आपले यज्ञपशू खुल्या मैदानात मारत असतात, ते त्यांनी दर्शनमंडपाच्या दाराशी याजकाकडे परमेश्वरासमोर आणून परमेश्वराप्रीत्यर्थ शांत्यर्पणे म्हणून अर्पावेत.


आणि तो पशू दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पण करण्यासाठी आणला नाही, तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.


जे कोणी असली अमंगळ कृत्ये करतील त्या सर्वांचा स्वजनातून उच्छेद व्हावा.


कोणी स्त्री कुकर्म करायला एखाद्या पशूकडे जाईल तर त्या स्त्रीला व त्या पशूला मारून टाकावे; त्यांना अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुष गमन करील व तिची काया उघडी करील तर त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा केला असे होईल; त्या दोघांचाही स्वजनातून उच्छेद व्हावा.


मीही त्या मनुष्याला विन्मुख होऊन त्याचा स्वजनांतून उच्छेद करीन; कारण त्याने आपले अपत्य मोलखास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले आहे आणि माझ्या पवित्र नावाला कलंक लावला आहे.


त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


त्याच्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीच्या मांसापैकी काहीही तिसर्‍या दिवशी खाण्यात आले तर ते मान्य होणार नाही; उलट, ते अमंगळ ठरेल; आणि जो कोणी ते खाईल त्याला त्याच्या अपराधाची शिक्षा भोगावी लागेल.1


म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.


मी दार आहे. माझ्या द्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारणप्राप्ती होईल; तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल.


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


ह्याप्रमाणे ज्या माणसाकडे देव कर्मावाचून नीतिमत्त्व गणतो त्याच्या धन्यतेचे वर्णन दावीदही करतो,


कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही.


शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली.


हे परमेश्वरा, ज्या इस्राएल लोकांचा तू उद्धार केला आहेस त्यांना क्षमा कर; तुझ्या इस्राएल लोकांमध्ये निरपराध माणसाच्या हत्येचा दोष राहू देऊ नकोस. ह्या रक्तपाताच्या दोषाची त्यांना क्षमा केली जावो.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan