लेवीय 17:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कोणा मनुष्याने, मग तो स्वदेशीय असो अथवा परदेशीय असो, मेलेल्या अथवा श्वापदांनी फाडून मारलेल्या पशूंचे मांस खाईल तर त्याने आपले कपडे धुऊन पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे म्हणजे तो शुद्ध होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 “कोणी मनुष्याने मग तो त्यांच्यामध्ये राहणार किंवा परदेशीय असो! तो जर मरण पावलेल्या किंवा जंगली जनावराने मारलेल्या प्राण्याचे मांस खाईल त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; म्हणजे तो शुद्ध होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “ ‘जर कोणत्या व्यक्तीने, मग तो देशात जन्मलेला किंवा विदेशी असो, यापैकी जो कोणी मेलेल्या किंवा जंगली जनावराने फाडलेल्या मृत प्राण्याचे मांस खाईल, त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने स्नान करावे आणि तो संध्याकाळपर्यंत विधिनियमानुसार अशुद्ध राहील आणि त्यानंतर तो शुद्ध होईल. Faic an caibideil |