Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्त सेवन केले तर रक्त सेवन करणार्‍या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या परदेशीय लोकांपैकी कोणी रक्त सेवन केले! तर मी त्या मनुष्यापासून आपले तोंड फिरवीन व त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 17:10
25 Iomraidhean Croise  

तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.


तो म्हणाला, “हे परमेश्वरा, असे कृत्य माझ्याकडून न घडो; जे आपल्या प्राणांवर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय?” ह्यास्तव तो ते पिईना; त्या तीन वीरांनी हे कृत्य केले.


वाईट करणार्‍यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो.


जो कोणी त्याच्यासारखे मिश्रण तयार करील किंवा कोणा परक्याला ते लावील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.”


कारण मी ह्या नगराकडे तोंड केले आहे ते त्याच्या वाइटासाठी, त्याच्या बर्‍यासाठी नव्हे, असे परमेश्वर म्हणतो; ते बाबेलच्या राजाच्या हाती जाईल, तो त्याला आग लावून देईल.’


“ह्यामुळे सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमचे अनिष्ट करण्यासाठी व सर्व यहूदाचा उच्छेद करण्यासाठी मी तुम्हांला विन्मुख होईन.


मी त्याला विमुख होईन; त्याला मी विस्मय, चिन्ह व जननिंदा ह्यांचा विषय करीन व त्याचा माझ्या लोकांतून उच्छेद करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


मी त्यांना विमुख होईन, ते अग्नीतून बाहेर पडले तरी अग्नी त्यांना खाऊन टाकील; मी त्यांना विमुख होईन, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


ह्यास्तव त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो की : तुम्ही रक्तासहित मांस खाता, आपल्या मूर्तींकडे डोळे लावता आणि रक्तपात करता; असे जे तुम्ही त्या तुम्हांला ह्या देशाचे वतन मिळेल काय?


तुम्ही मला अन्न, चरबी व रक्त अर्पण करताना मनाने व शरीरानेही बेसुंती अशा परक्या लोकांना माझ्या पवित्रस्थानात आणून माझे मंदिर भ्रष्ट केले आहे. ह्याप्रमाणे तुम्ही माझा करार मोडून आपल्या सर्व अमंगळ कृत्यांमध्ये भर घातली आहे.


शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जिवांबद्दल वेदीवर प्रायश्‍चित्त करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीवन असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्‍चित्त होते.


तुम्ही कोणतेही मांस रक्तासह खाऊ नका; तुम्ही काही मंत्रतंत्र करू नका व शकुनमुहूर्त पाहू नका.


मी तुम्हांला विन्मुख होईन; तुमच्या शत्रुंपुढे तुमचा पराभव होईल; तुमचे वैरी तुमच्यावर अधिकार गाजवतील व कोणी पाठीस लागला नसतानाही तुम्ही पळाल.


तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.”


आणि ते शत्रूंपुढे पाडाव होऊन गेले असले, तरी तेथे मी तलवारीला आज्ञा करीन म्हणजे ती त्यांना वधील; मी त्यांच्याकडे दृष्टी लावीन, ती त्यांच्या वाइटासाठी असेल, बर्‍यासाठी नव्हे.”


तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तींचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा.


त्या म्हणजे मूर्तीला अर्पण केलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावीत; ह्यांपासून स्वत:ला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.”


त्याचे रक्त मात्र सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे.


त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये, हे लक्षात ठेव; कारण रक्त हे जीवन होय; म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये;


मात्र त्याच्या रक्ताचे तू सेवन करू नयेस; तू ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून द्यावेस.


तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते?


म्हणून ते लुटीवर तुटून पडले आणि मेंढरे, बैल व वासरे जमिनीवर कापून रक्तासहित खाऊ लागले.


शौलाला कोणी असे सांगितले की, “लोक रक्तासहित मांस खाऊन परमेश्वराचा अपराध करीत आहेत,” तेव्हा तो म्हणाला, “तुम्ही विश्वासघात केला आहे; एक मोठा दगड माझ्याकडे लवकर लोटून आणा.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan