लेवीय 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याने तागाचा पवित्र अंगरखा घालावा; तागाचा चोळणा आपल्या अंगात घालावा; तागाच्या कमरबंदाने आपली कंबर कसावी आणि तागाचा मंदील घालावा; ही पवित्र वस्त्रे होत. त्याने पाण्याने स्नान करून ही वस्त्रे परिधान करावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्याने तागाचा पवित्र झगा घातला पाहिजे आणि त्याच्या शरीराभोवती तागाचे अंतर्वस्त्र घालावे; तागाच्या वस्त्राने आपली कंबर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा. ही पवित्र वस्त्रे आहेत; म्हणून ती अंगावर घालण्यापूर्वी त्याने पाण्याने स्नान करावे. Faic an caibideil |