Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकर्‍याला रानात सोडून द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 जिथे कोणी राहत नाही अशा प्रदेशात तो बोकड लोकांच्या पापाचा भार वाहून नेईल, नंतर त्या मनुष्याने त्या बोकडाला रानात सोडून द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 16:22
13 Iomraidhean Croise  

आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हांला शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.


पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत.


त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत, त्याने केलेल्या नीतिमत्तेमुळे तो वाचेल.


आणखी तू आपल्या डाव्या कुशीवर नीज व इस्राएल घराण्याचा अधर्म त्या कुशीवर ठेव; जितके दिवस तू त्या कुशीवर निजून राहशील, तितके दिवस त्यांच्या अधर्माचा भार वाहत राहा.


आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून द्यावे;


अहरोनाने आपले दोन्ही हात त्या जिवंत बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून इस्राएल लोकांची सर्व दुष्कर्मे व अपराध ह्यांचा म्हणजे त्यांच्या सर्व पापांचा अंगीकार करावा; व ती त्या बकर्‍याच्या डोक्यावर ठेवून त्याला नेमलेल्या मनुष्याच्या हाती रानात पाठवून द्यावे.


हे झाल्यावर अहरोनाने दर्शनमंडपात येऊन पवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरवून तेथे ठेवावीत.


तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील; आमचे अपराध पायांखाली तुडवील; तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील.


दुसर्‍या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!


आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले; “जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे” असा शास्त्रलेख आहे;


त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्‍यांदा दिसेल.


‘त्याने स्वतः तुमची आमची पापे’ स्वदेही ‘वाहून’ खांबावर ‘नेली’, ह्यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या ‘माराने तुम्ही निरोगी झाला आहात.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan