Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 16:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग त्याने लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बकर्‍याचा वध करावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि जसे त्याने गोर्‍ह्याच्या रक्ताचे केले तसेच बकर्‍याच्या रक्ताचे करावे, म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 मग अहरोनाने लोकांसाठी आणलेला पापार्पणाचा बकरा वधावा; त्याचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि त्याने गोऱ्ह्याच्या रक्ताचे जसे केले तसेच बकऱ्याच्या रक्ताचे करावे म्हणजे ते दयासनावर व दयासनासमोर शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 16:15
15 Iomraidhean Croise  

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन.


पहिला गोर्‍हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्‍हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय.


अभिषिक्त याजकाने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;


मोशेने तसे केले; परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती तसे त्याने केले;


आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्यांखेरीज परमेश्वराप्रीत्यर्थ पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा.


म्हणून त्याला सर्व प्रकारे ‘आपल्या बंधूंसारखे’ होणे अगत्याचे होते, ह्यासाठी की, लोकांच्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त करण्याकरता त्याने स्वत: देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे.


आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे.


ती आशा आपल्या जिवासाठी नांगर अशी असून स्थिर व अढळ ‘पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी’ आहे.


त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.


आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली.


कारण बकर्‍यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात,


आणि दुसर्‍या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता;


परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan