Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 16:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 मग त्याने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे, आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 त्याचप्रमाणे त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त घेऊन ते दयासनावर पूर्वेस बोटाने शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 मग त्याने गोर्‍ह्याचे काही रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी दयासनाच्या पूर्वेस शिंपडावे आणि काही रक्त दयासनासमोर सात वेळा शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 16:14
14 Iomraidhean Croise  

आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी.


याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर, ते सात वेळा शिंपडावे.


त्यातील थोडे तेल घेऊन त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यांना पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.


मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शनमंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे;


म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे;


कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे.


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


कारण बकर्‍यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात,


आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले.


आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते;


परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan