Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 आणि परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखार्‍यांनी भरलेले धूपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 नंतर अहरोनाने परमेश्वरासमोर असलेल्या वेदीवरील निखाऱ्यांनी भरलेले धुपाटणे घ्यावे आणि कुटून बारीक केलेला ओंजळभर सुगंधी धूप अंतरपटामागील आतल्या खोलीत आणावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 याहवेहच्या वेदीसमोरील धुपाटण्यात जळते निखारे भरून घ्यावेत व कुटून बारीक केलेला व दोन मुठीत भरेल एवढा सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 16:12
13 Iomraidhean Croise  

अभिषेकाचे तेल व पवित्रस्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे.” कराराची खूण म्हणून पाळायचा शब्बाथ दिवस


त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवतात तसा बनवला.


अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.


तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेवला व त्यावर धूप घातला, आणि मोशे व अहरोन ह्यांच्याबरोबर ते दर्शनमंडपाच्या दाराजवळ उभे राहिले.


मग मोशे अहरोनाला म्हणाला, “धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून ते ताबडतोब मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर, कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे.”


ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.


पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते.


तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यात ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan