Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 16:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्‍चित्त करावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “अहरोनाने स्वतःसाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी पापार्पणाच्या गोर्‍ह्याचा वध करून प्रायश्चित्त करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 16:11
6 Iomraidhean Croise  

अहरोनाने पवित्रस्थानात प्रवेश करावा तो ह्याप्रमाणे : त्याने पापार्पणासाठी एक गोर्‍हा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे.


त्याने पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.


अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाचा गोर्‍हा सादर करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी अर्पून प्रायश्‍चित्त करावे.


मोशेने अहरोनाला सांगितले, “वेदीजवळ जाऊन आपला पापबली व होमबली ह्यांचे अर्पण कर आणि स्वतःसाठी व लोकांसाठी प्रायश्‍चित्त घे; आणि लोकांकडचे बलीही अर्पण करून त्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त कर; परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे हे कर.”


त्याला त्या प्रमुख याजकांप्रमाणे पहिल्याने स्वतःच्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही; कारण त्याने स्वतःला अर्पण केल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे.


परंतु दुसर्‍यात प्रमुख याजक एकटाच वर्षातून एकदा जात असतो तेव्हा स्वतःबद्दल व लोकांच्या अज्ञानाने झालेल्या पापांबद्दल1 जे रक्त अर्पण करत असतो, ते घेतल्याशिवाय जात नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan