Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवायच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्ष्याला माळरानात सोडून द्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर सात वेळा शिंपडावे; मग तो शुद्ध झाला आहे असे सांगावे व त्यानंतर याजकाने माळरानात जाऊन त्या जिवंत पक्ष्यास सोडून द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मग याजकाने ते रक्त कुष्ठरोगातून मुक्त झालेल्या व्यक्तीवर सात वेळा शिंपडावे व तो शुद्ध झाला आहे, असे जाहीर करून त्या जिवंत पक्ष्याला उघड्या शेतात सोडून द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:7
29 Iomraidhean Croise  

अलीशाने एका जासुदाच्या हाती त्याला सांगून पाठवले की, “जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील.”


मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन सात वेळा बुचकळ्या मारल्या; तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला.


मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर.


एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन.


त्याप्रमाणे तो अनेक राष्ट्रांना दचकायला लावील;2 राजे त्याला पाहून आपली तोंडे बंद करतील; कारण कोणी सांगितल्या नाहीत असल्या गोष्टी ते पाहतील; त्यांच्या कानी पडल्या नाहीत असल्या गोष्टी त्यांना कळतील.


मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यांपासून मी तुमची शुद्धी करीन.


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


तर त्याने तपासणी करावी आणि त्याच्या सर्वांगास कोड झाले असल्यास त्याने त्या चट्टा पडलेल्या मनुष्याला शुद्ध ठरवावे; त्याचे सर्वांग शुभ्र झाले आहे, म्हणजेच तो शुद्ध होय.


याजकाने त्याची तपासणी करावी, आणि जर त्याचा चट्टा फिरून पांढरा झाला असेल, तर त्याने त्या चट्टा पडलेल्या माणसाला शुद्ध ठरवावे; तो शुद्ध होय.


मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी घेऊन त्या मारलेल्या पक्ष्याच्या रक्तात आणि वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर सात वेळा शिंपडावे;


मग त्याने गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन दयासनाच्या पूर्वेकडील बाजूला बोटाने शिंपडावे, आणि थोडे रक्त दयासनासमोर बोटाने सात वेळा शिंपडावे.


आणि थोडे रक्त घेऊन त्याने आपल्या बोटाने सात वेळा तिच्यावर शिंपडून ती इस्राएल लोकांच्या अशुद्धतेपासून शुद्ध व पवित्र करावी.


तो बकरा त्यांच्या सर्व दुष्कर्मांचा भार घेऊन निर्जन प्रदेशात वाहून नेईल; त्या मनुष्याने त्या बकर्‍याला रानात सोडून द्यावे.


याजकाने त्या रक्तात आपले बोट बुडवावे आणि परमेश्वरासमोर, अंतरपटासमोर, ते सात वेळा शिंपडावे.


याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर, पवित्रस्थानाच्या अंतरपटासमोर ते सात वेळा शिंपडावे.


त्यातील थोडे तेल घेऊन त्याने वेदीवर सात वेळा शिंपडले आणि वेदी, तिची सर्व उपकरणे, गंगाळ व त्याची बैठक ह्यांना पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.


तो वळून पुन्हा आमच्यावर दया करील; आमचे अपराध पायांखाली तुडवील; तू त्यांची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील.


त्याने तिसर्‍या दिवशी व सातव्या दिवशी ती राख घेऊन स्वतःला शुद्ध करावे; तथापि तिसर्‍या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने स्वतःला शुद्ध केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही.


तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले.


म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.


नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे.


कारण बकर्‍यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात,


नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकर्‍यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले,


आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले.


तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे.


देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून : तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.


जो पाण्याच्या द्वारे व रक्ताच्या द्वारे आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त; पाण्याने केवळ नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan