Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:34 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 “जो कनान देश मी तुम्हांला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 कनान देश मी तुम्हास वतन म्हणून देत आहे. तुमचे लोक त्यामध्ये जाऊन पोहोंचतील त्यावेळी तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:34
28 Iomraidhean Croise  

परमेश्वर अब्रामाला दर्शन देऊन म्हणाला, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार.” परमेश्वराने त्याला दर्शन दिले म्हणून त्याने तेथे परमेश्वराची एक वेदी बांधली.


ऊठ, ह्या देशाची लांबीरुंदी फिरून पाहा, कारण तो मी तुला देणार आहे.”


ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्‍चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन.”


“तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिसरी लोकांवर जे रोग मी पाठवले त्यांपैकी एकही तुझ्यावर पाठवणार नाही; कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे.


परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; पण नीतिमानांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो.


प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे.


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,


कपड्यावरील अथवा घराचा महारोग,


त्यांचा देश तुमचे वतन होईल, ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश तुमच्या ताब्यात देईन, असे मी तुम्हांला सांगितले आहे. तुम्हांला इतर राष्ट्रांपासून वेगळे करणारा मी परमेश्वर तुमचा देव आहे.


“इस्राएल लोकांना सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचाल व त्यातील पीक कापाल, तेव्हा आपल्या पिकाच्या पहिल्या उपजाची पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;


“इस्राएल लोकांना असे सांग : मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ पाळावा.


नगरात रणशिंग वाजवल्यास लोक घाबरायचे नाहीत काय? नगरावर विपत्ती आली असून ती परमेश्वराने आणली नाही असे होईल काय?


कारण पाहा, परमेश्वर आज्ञा करील तेव्हा मोठ्या घरांना भगदाडे पाडण्यात येतील आणि लहान घरांना भेगा पाडण्यात येतील.


परमेश्वर ह्या नगरास हाक मारीत आहे; जो शहाणा आहे तो तुझे नाम ओळखतो - “तुम्ही दंडाचे व तो नेमणार्‍याचे ऐका.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी हा पट चालवला आहे, तो चोराच्या घरात व माझ्या नामाची खोटी शपथ घेणार्‍याच्या घरात शिरेल; तो त्याच्या घरात बिर्‍हाड करून राहील आणि त्याच्या तुळयांचे व चिर्‍यांचे भस्म करील.”


तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हांला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्राएलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल, आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल.


आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ, पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे.”


“इस्राएल लोकांना सांग : यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहचाल,


जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावेत.


तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरांत व घरांत वस्ती करशील,


तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात पोहचल्यावर तू त्याचा ताबा घेऊन त्यात वस्ती करशील,


आणि तू पलीकडे जाशील तेव्हा त्या धोंड्यांवर ह्या नियमशास्त्राची सर्व वचने लिहून काढ, म्हणजे जो देश तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर आपल्या वचनाप्रमाणे तुला देत आहे व ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत त्या देशात तुझा प्रवेश होईल.


“मवाब देशात यरीहोसमोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्राएल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पाहा;


आणि परमेश्वर तुझ्यापासून सर्व प्रकारचे रोग दूर करील. मिसर देशातल्या ज्या दुःखदायक व्याधी तुला ठाऊक आहेत, त्यांतली एकही तुला लागणार नाही; पण तुझ्या सर्व द्वेष्ट्यांना तो त्या लावील.


यहोशवा आता वृद्ध व वयातीत झाला होता; तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यायचा राहिला आहे.


परमेश्वर प्राण हरण करतो आणि प्राणदानही करतो; तो खाली अधोलोकी नेतो आणि तो वरही आणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan