Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 14:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळवण्याची ऐपत नसेल त्याच्यासंबंधीचा हा नियम होय.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 अंगावरील महारोगाचा चट्टा बरा झालेल्या मनुष्यास आपल्या शुद्धीकरणासाठी साहित्य मिळण्याची ऐपत नसलेल्या मनुष्याच्या शुद्धीकरणासंबंधी हे नियम आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 हे नियम सर्वसाधारणपणे शुद्धीकरणासाठी लागणारे अर्पण आणण्याची ऐपत नसलेल्या कुष्ठरोग्यांसाठी आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 14:32
12 Iomraidhean Croise  

ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे; कारण त्याची दया सनातन आहे.


“एखाद्या मनुष्याच्या अंगावरील कातडीला सूज, खवंद अथवा तकतकीत डाग असेल व तो महारोगाचा चट्टा असेल तर त्याला अहरोन याजकाकडे किंवा त्याच्या याजकपुत्रांपैकी एकाकडे न्यावे;


लोकरीच्या किंवा सणाच्या वस्त्रावर, त्याच्या ताण्यावर अथवा बाण्यावर अथवा चामड्याच्या कोणत्याही वस्तूवर महारोगाचा चट्टा दिसून आला तर ती शुद्ध किंवा अशुद्ध ठरवण्याचा हा नियम होय.”


आठव्या दिवशी दोन दोषहीन कोकरे, एक वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले तीन दशांश एफा2 सपीठ व एक लोगभर2 तेल हे आणावे.


“महारोग्यास शुद्ध ठरवण्याच्या वेळचा नियम हा : त्याला याजकाकडे आणावे;


तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्‍चित्तासाठी ओवाळणीचे एक कोकरू दोषार्पण म्हणून आणावे, आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले एक दशांश एफा सपीठ आणि लोगभर तेल आणावे;


त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसर्‍याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे; ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवायच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्‍चित्त करावे.


परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला,


‘आंधळे पाहतात,’ पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व ‘गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते’;


Lean sinn:

Sanasan


Sanasan